अभ्यास करताना रडणारी चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; पाहून चाहतेही पडले गोंधळात


एखाद्या स्टारच्या चाहत्यांना त्यांची एक झलक पाहायला मिळाली तर त्यांचा दिवस खास ठरतो. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहायला खूप आवडतात. चाहते त्यांच्या जुन्या फोटोंची उत्सुकतेने वाट देखील पाहत असतात. याच दरम्यान बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. ज्यात ती तिच्या आईसोबत दिसत आहे.

हा फोटो समोर आल्यापासून ही कोणती अभिनेत्री आहे, हे सांगणे चाहत्यांना खूप कठीण जात आहे. सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते तिला ओळखण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून, फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिचा आहे. या फोटोमध्ये ती अभ्यास करताना दिसत आहे. यात तिची आई देखील तिच्यासोबत बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये फातिमा रडताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, तिने नारंगी रंगाचा टीशर्ट घातला आहे आणि तिच्या हातामध्ये एक पुस्तक देखील आहे.

फातिमा सना शेखच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानशी (Aamir Khan) जवळीक असल्याबद्दल ती आजकाल खूप चर्चेत असते. तिने आमिर खानसोबत ‘दंगल’ या चित्रपटात काम केले आहे. यात ती आमिर खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. इतकेच नाही, तर ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात देखील ती आमिर खानसोबत दिसले. परंतु त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!