Friday, March 29, 2024

बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

बॉलिवूडमधील ‘धाकड गर्ल’ कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच बॉलिवूडमध्ये आणि आता राजकारणात देखील सर्वत्र चर्चेत असते. आपल्या स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे तिला सर्वत्र ट्रोल केले जाते. प्रत्येक वेळी कंगनाने बॉलिवूडपासून ते अगदी भारताच्या राजकारणात अनेक वेगवेगळे प्रश्न उठवले आहेत. प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अडचणीमध्ये तिने तिचे विचार देखील मांडले आहेत. त्यामुळे तिला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता देखील ती तिच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चित आहे. कंगनाने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिचे ट्विटर अकाऊंट कायम स्वरुपी निलंबित केले आहे. ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर आता कंगनाने तिचा सगळा राग इंस्टाग्रामवर व्यक्त केला आहे.

ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यामुळे कंगनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून राग व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने बंगालची तुलना काश्मीरसोबत आणि ममता बॅनर्जी यांची तुलना रक्तासाठी भुकेलेल्या ताडका राक्षसी सोबत केली आहे. या सोबतचे तिने भारत सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमध्ये तिने अगदी रडून रडून तिचे दुःख व्यक्त केले आहे.

या व्हिडिओमध्ये तिने बंगाल हिंसेबाबत म्हटले आहे की, “मित्रांनो आपण पाहतच आहोत की, बंगालवरून हैराण करणाऱ्या घटना समोर येत आहेत. अनेकांची हत्या होत आहे, गँगरेप होत आहे, अनेक घरांना आग लावली जात आहे. पण याबाबत कोणीही काहीच बोलायला तयार नाहीये. इंटरनॅशनल मीडिया या घटनांकडे कानाडोळा करत आहे.”

तिने पुढे म्हटले की, “मला कळत नाहीये की, हा कोणता कट रचला जात आहे. ही माणसे नक्की आपल्यासोबत काय करू इच्छित आहेत. काय आपल्या हिंदूंचं रक्त एवढं स्वस्त झालं आहे का? आपण देशद्रोहींना एवढे का घाबरत आहोत? आता काय देशद्रोही आपला देश चालवणार आहेत का? हो मला माहित आहे की, आपल्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. मला माहित आहे की, आपण वाईट पद्धतीने अडकलो आहोत. पण आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. याआधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 12 वेळा, इंदिरा गांधींनी 50 वेळा आणि मनमोहन सिंग यांनी 11 वेळा राष्ट्रपटी राजवट लागू केली होती. मग आपण कोणाला घाबरत आहोत? त्यामुळे आपल्या सरकारला माझे सांगणे आहे की, त्यांनी लवकरात लवकर मोठे पाऊल उचलावे.”

पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या घटनांबाबत कंगनाने ट्विटरवर खूप पोस्ट केल्या होत्या. बंगालमध्ये झालेल्या हत्यांवर तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा विजय झाल्यानंतर तेथील परिस्थितीवरून ती राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत होती. पण आता ट्विटरने तिचे अकाऊंट निलंबित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने दिले नव्हते ऑडिशन, मुलाखतीत केला खुलासा

-जेव्हा सेटवर दयाबेनला ‘ए पागल औरत’ बोलणे जेठालालला पडले होते भलतेच महाग!

हे देखील वाचा