आपल्या सडेतोड वक्तव्याने नेहमी चर्चेत असलेली कंगणा रनौत पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस ही भलत्याच कारणाने प्रसिद्ध होतेय. कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. कंगना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. ती सध्या आपले नशीब राजकारणात आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ती सतत दोऱ्यावर असते. तिचा नुकताच विमान तळावरुन जात असतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) नेहमी आपल्या वक्तव्यामुळे ओळखली जाते. मात्र, यावेळेस चर्चेचा विषय बनण्याचे कारण म्हणजे तिची साडी आहे. कंगणा एका दोऱ्यावरुन येत असताना तिला मिमान तळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा ती सिंपल साडीमध्ये केस मोकळे आणि हातामध्ये काळ्या रंगाची बॅग कॅरी करताना दिसली. पण अभिनेत्रीने साडीची किंमत सांगून सगळ्यांना हैराणच केले आहे.
कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन या व्हिडिओसोबत एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टसोबत अभिनेत्रीने आपल्या साडीची किंमत फक्त 600 रुपये सांगितली आहे, आणि सोबत जो बॅग घेतला आहे त्याची किंमत साडे तीन लाख रुपये सांगितली आहे. त्यासोबतच तिने भवल्यामोठ्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, स्टइल कोणत्याही आंतरराष्ट्रीय बांडवर अवलंबून नाही. राष्ट्रवादी बना…स्वत:चा प्रचार करा. तुमचे प्रत्येक काम देशाला फायद्याचे ठरले पाहिजे. लोकल गोष्टी खरेदी करा… यामुळे अनेक कुटुंबाचे पोट भरते. वोकल फॉर लोकल, जय हिंद!
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच नवीन चित्रपट एमरजेंसी चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामध्ये ती इंदिरा गांधी यांची भुमिका साकारणार आहे. यापूर्वी ती धाकड चित्रपट आणि टेलिव्हिज शो लॉकअप मध्ये झळकली होती. कंगनाचा धाकड चित्रपट बॉक्सऑफिसवर दणक्यात आदळला होता. बॉलिवूडमध्ये प्रत्येकच चित्रपट अयशस्वी होताना दिसत आहे. आता कंगना तर नोहमीच प्रेक्षकांच्या चर्चत असल्यामुळे तिचा नवीन चित्रपट किती चालतो हे पाहाने खूपच महत्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
नर्गिस फाखरीने खोलली बाॅलिवूडची पोल; म्हणाली, ‘मला…’
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार