नेहमी वेगवेगळ्या विषयांवरील निर्भीड व्यक्तव्यांमुळे कंगना रणौत चर्चेचा विषय असते. कंगना प्रत्येकवेळी राजकारण, सिनेसृष्टी, सामाजिक आदी अनेक विषयांवर ती बेधडकपणे तिचे मत मांडते. तिच्या व्यक्तव्यांमुळे अनेकदा ती वादांमध्ये देखील अडकली असते. यामुळेच तिला ‘पंगा’ गर्ल म्हणून देखील ओळख मिळाली आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी नुकताच ते घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयासंबंधित एक पोस्ट कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने आंतरजातीय लग्नांवर प्रश्न उपस्थित केला आहे.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ” एक वेळ होती जेव्हा पंजाबमध्ये अनेक कुटुंबात एक मुलगा हिंदी, तर एक मुलगा शीख होण्याची पद्धत होती. असे कधीच मुस्लिम आणि शीख, हिंदू आणि मुस्लिम किंवा मुसलमान लोकांसोबत पाहायला मिळाले नाही. आमिर सरांच्या दुसऱ्या घटस्फोटावर मला खरंच खूप हैराणी होत आहे की, आंतरजातीय लग्नामध्ये मुलं नेहमी मुस्लिम का होतात? का स्त्रिया हिंदूच नाही राहू शकत? बदलणाऱ्या काळासोबत आपण हे देखील बदलले पाहिजे. ही पद्धत जुनी आणि आपल्याला अजून मागे घेऊन जाणारी आहे.”
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले, “जर एका कुटुंबात हिंदू, जैन, बौद्ध, शीख, राधा स्वामी, नास्तिक सोबत राहू शकतात तर मुस्लिम का नाही? मुस्लीमासोबत लग्न करताना धर्म बदलण्याची गरज का पडते?” कंगनाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून त्यावर अनेक लोकं त्याचे मतं मांडत आहे.
आमिर आणि किरण यांनी २८ डिसेंबर २००५ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने एक मुलगा झाला आहे. किरण रावशी आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता यांनी लग्न केले होते. मात्र १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुले आहेत.
कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…