बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्शियल क्वीन कंगना रणौत या ना त्या कारणाने चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच ती पुन्हा एकदा नव्या अडचणीत सापडली आहे. ही गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, कंगना नेहमीच काही ना काही बिनाबुडाचे वक्तव्य करत असते. ज्यामुळे ती चर्चेत येते. आता तिच्या अशाच एका वकव्यातमुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका ज्येष्ठ महिलेबाबत कमेंट केल्याबाबत तिच्या विरुद्ध मानहखनीचा दावा दाखल केला आहे. या केसमध्ये तिला नोटीस देखील पाठवली गेली आहे. तिला १९ एप्रिल रोजी बठिंडा कोर्टमध्ये हजर होण्यासाठी सांगितले आहे.
कंगनाच्या (kangana ranaut) विरुद्ध केस काढणाऱ्या वकिलांचे असे म्हणणे आहे की, जे दिलेल्या तारखेला कंगना कोर्टात हजर झाली नाही, तर तिला अटक वॉरंट पाठवले जाईल. त्यांनी हे देखील सांगितले की, या गोष्टीची सुरुवात ४ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. याची सुनावणी १३ महिने चालली. त्यानंतर आता कोर्टाने तिला हजर राहण्यास सांगितले आहे.
बठिंडा गावी राहणाऱ्या एका ज्येष्ठ शेतकरी महिलेबद्दल कंगनाने एक ट्विट केले होते की, ही महिला १०० रुपयाच्या आंदोलनमध्ये सामील होत असते. त्यानंतर तिला खूप ट्रोल केले होते. त्यानंतर त्या महिलेने कंगना विरुद्ध केस दाखल केली.
झाले असे होते की, कंगनाने सीएप्रोटेस्टमध्ये सामील झालेली आजी समजून त्या महिलेचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, “या त्याच आजी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने पावरफुल इंडियन सांगितले होते. ही तर १०० रुपयात उपलब्ध होईल.”
कंगनाचे हे ट्विट जेव्हा व्हायरल झाले तेव्हा समजले की, कंगनाने चुकीच्या व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर कंगनाने ते ट्विट लगेच डिलीट केले होते. परंतु आता कंगनाचे या बाबत काय प्रतिक्रिया येणार आहेत. हे बघणे महत्वाचे आहे. कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, ती ‘थलायवी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर तिचे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा :