Saturday, June 29, 2024

‘प्रभू रामाप्रमाणे तुमचे नाव…’, कंगणा रणौतने पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा, पाहा व्हायरल पोस्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. 17 सप्टेंबर1950रोजी गुजरातमधील वडनगर येथे त्यांचा जन्म झाला होता. एका सामान्य कुटुंबातून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत. त्यांचे नेतृत्वाखाली भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य जनता ते राजकीय नेते, सेलिब्रिटी असे सर्वजण पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही मोदींसाठी शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

या खास प्रसंगी, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कंगना रणौतने पीएम मोदींसाठी (Narendra Modi Birthday) खास पोस्ट शेअर केल्या आहेत. अक्षय कुमारने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, त्यांने पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या प्रगतीचा गौरव केला आहे. त्यांने म्हटले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा नरेंद्र मोदी जी. वर्षानुवर्षे आम्हाला प्रेरणा देत राहा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा.” तसेच त्याने मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

कंगना रणौतनेही इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तिने पीएम मोदींची तुलना श्रीरामाशी केली आहे. तिने म्हटले आहे की, “जगातील सर्वात प्रिय नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक सामान्य माणूस, ज्याने कठोर परिश्रम आणि चिकाटीने सशक्तीकरणाच्या शिखरावर पोहोचला आणि नवीन भारताचा निर्माता बनला.”

कंगनाने पुढे लिहिले की, “तुम्ही केवळ भारतीयांसाठी पंतप्रधान नाही, तर प्रभू रामाप्रमाणे तुमचे नाव या देशाच्या चेतनेमध्ये कायमचे कोरले गेले आहे. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.” अक्षय कुमार आणि कंगना रणौतने केलेल्या या पोस्टना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. देशभरातील लोकांनी या दोन्ही सेलिब्रिटींच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अधिक वाचा-
खऱ्या आयुष्यात प्रेमात केव्हा पडणार? प्राजक्ता माळीने प्रेमाबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…
गौतमी पाटीलने आक्षेप घेणाऱ्यांना ठणकावून सांगितले; म्हणाली, ‘माझ्या कार्यक्रमांत गोंधळ…’

हे देखील वाचा