भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती असलेल्या इम्युनल मॅक्रोन यांनी खास जेवणाचे आयोजन केले होते. या सोहळ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. या खास भोजनाचे आयोजन Louvre Museum इथे केले होते. यासाठी अतिशय मोजक्या आणि विशेष पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले होते. या फोटोंमध्ये खास लक्ष वेधून घेतले ते बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेता असलेल्या आर माधवनने. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून माधवनने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या भोजनाचे मोजके फोटो शेअर करत एक नोट देखील लिहिली आहे.
माधवनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पंतप्रधान मोदींसोबत हातात हात घालून उभा असून, दुसऱ्या फोटोमध्ये तो तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या संगीतकार रिकी केज आणि इम्युनल मॅक्रोन यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी त्याचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेले खास बॉन्डिंग देखील दिसून येत आहे. यावेळी माधवनने हिरव्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टाय आणि ग्रे सूट घातलेला आहे.
View this post on Instagram
आर माधवनने या फोटोंसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये तो पीएम मोदी, मॅक्रोन, माजी फ्रांसी फुटबॉलर मॅथ्यू प्लॉयमेनी यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो मॅक्रोनसोबत चर्चा करताना देखील दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले, “१४ जुलै २०२३ पॅरिसमध्ये बॅस्टियल दिवस समारंभाच्या दरम्यान भारत फ्रांस यांच्या संबंधांसोबतच देशातील लोकांसाठी अधिक काही चांगले करण्याच्या निमित्ताने. या डिनरमध्ये काही सरप्राइजेस होते. राष्ट्रपती मॅक्रोन आणि पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानासाठी आणि या दोन महान मित्र देशाच्या भविष्यासाठी.” दरम्यान आर माधवनच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो रॉकेटरी या सिनेमात अखेरचा दिसला होता.
अधिक वाचा-
–“वाट्टेल ते बोलण्याचा परवाना…” रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
–नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ