करिना कपूरने ‘या’ कलाकारासोबत काम करण्यास दिला होता नकार, सध्या गाजवतोय हिंदी सिनेसृष्टी

0
141
Kareena Kapoor
Photo Courtesy: Instagram/kareenakapoorkhan

हिंदी सिने जगतातील कलाकारांचे असे अनेक किस्से असतात. जे काही काळाने सिने जगतात प्रचंड चर्चेत येतात. कलाकारांचा वाद असो, सेटवरील मस्ती असो किंवा चित्रपटाचे रंगलेले किस्से असो. सिने जगतातील या कलाकारांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. असाच किस्सा अभिनेत्री करिना कपूरच्या बाबतीत घडला होता. करिनाचा हा किस्सा ‘उडता पंजाब’ चित्रपटादरम्यान घडला होता. ज्यामध्ये तिने शाहीद कपुरसोबत काम केले होते. जाणून घेऊया चित्रपटावेळी घडलेला रंजक किस्सा.  

करिना कपूर (kareena kapoor) ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तो काळ करिनाने चांगलाच गाजवला होता. २०१५ मध्ये करिना कपूर आणि शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’ चित्रपट सुपरहीट ठरला होता. परंतु शाहीद कपूरच्या आधी या चित्रपटासाठी आयुष्यमान  खुरानाची निवड करण्यात आली होती. आयुषमान स्वतः चंदिगडचा असल्याने पंजाबरील ड्रग्स विषय असलेल्या या चित्रपटात तो दमदार काम करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्याचबरोबर स्वतः आयुषमान खुरानाही या चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक होता.

परंतु अभिनेत्री करिना कपूरला जेव्हा ती आयुषमान खुरानासोबत काम करणार असल्याचे समजले तेव्हा तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. इतकेच नव्हेतर मी फक्त मोठ्या कलाकारांसोबत काम करते असेही करिनाने सांगितले. दिग्दर्शकाच्या समजुतीनंतरही करिना तिच्या शब्दावर ठाम होती. त्यामुळेच तिच्या या  हट्टापुढे हार मानत आयुशमानला चित्रपटातून हटवण्यात आले. करिना तिच्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्यासोबत काम करु इच्छिते असे कारण यासाठी देण्यात आले.

पण दुर्देव म्हणजे ज्या कलाकारासोबत करिनाने काम करण्यास नकार दिला. तो कलाकार सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने जगतात स्वतःएक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दम लगा के हइशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘बधाई दो’, ‘आर्टिकल 15’, ‘ड्रीम गर्ल’ अशा चित्रपटातील दमदार अभिनयाने आयुशमानने आपणही सुपरस्टार असल्याचेच दाखवून दिले आहे.

हेही वाचा –

चाहत्यांसाठी खुशखबर! राणादा आणि पाठक बाईंची जोडी झळकणार ‘या’ बिगबजेट चित्रपटात

‘जो दिखता है, वो बिकता है’ उर्फी जावेदने ट्रान्सपरेंट कटआऊट ड्रेस परिधान करताच भडकले चाहते

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार गुड न्यूज? माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यानंतर स्वतःच केला खुलासा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here