कंगना रानौतला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. याशिवाय विवादित वक्तव्य देखील तिची एक मोठी ओळख आहे. ती तिच्या या विधानामुळे देखील मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये गाजताना दिसते. सध्या ती तिच्या उत्तरप्रदेशमशील निवडणुकांमध्ये सक्रिय असल्यामुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर सतत बीजेपीला मत देण्यासाठी लोकांना अपील करताना दिसत आहे. पुन्हा एकदा कंगनाने इंस्टाग्रामवर उत्तरप्रदर्शचे मुख्यमंत्री असलेल्या योगी यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले आहे की, “आता कोणी उपाशी पोटी झोपणार नाही. योगी सरकार उत्तरप्रदेशसाठी सुख आणि समृद्धीचा संकेत आहे. योगी सरकारने पाच वर्षात १५ कोटी लोकांना मोफत राशन उपलब्ध करून दिले असून, गरीब गरजूंच्या घरात चुली पेटवल्या. योगी सरकार म्हणजे यूपीचा विकास.”
याआधी कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने भाजपाला मत देण्याचे आवाहन केले होते. व्हिडिओमध्ये कंगनाने सांगितले की, “नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की, उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांच्या रणधुमाळीत आपले एकमेव हत्यार आपले अमूल्य मत. लक्षात ठेवा आपल्याला आपल्या योगी सरकारला पुन्हा आणायचे असल्याने त्यांना भरभरून मतं द्या. या निवडणुकांआधी तिने नरेंद्र मोदी यांच्यासोबतच एक फोटो शेअर केला होता.
याआधी देखील तिने योगी सरकारच्या सर्व योजना सांगताना लिहिले की, “मिशन शक्तीमुळे झाल्या महिला सुरक्षित. मुलींना शिक्षण मिळाले, पुढे जाणायची संधी मिळाली, आत्मनिर्भर बनून फिरण्याचा अधिकार मिळाला. अर्ध्या लोकसंख्येला मिळाला पूर्ण सन्मान, योगी सरकारने वाढवला यूपीचा मान, ज्यांनी महिला आणि मुलींना सुरक्षित ठेवण्याचा उचललेला विडा, ज्यांनी केला यूपीचा विकास.”
कंगनाची काही महिन्यांपूर्वी ‘थालयवी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच ती ‘धाकड’ आणि ‘तेजस’ सिनेमात दिसणार आहे . याशिवाय कंगना लवकरच एकता कपूरचा ‘लॉकअप’ शो होस्ट करताना दिसणार आहे.
हेही वाचा –
‘एका जीवाचं वजन उचलतोय’ उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरीनंतरच्या स्त्रीच्या त्रासावरची पोस्ट व्हायरल
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ यशस्वी कलाकारांना वयाच्या पस्तिशीनंतर मिळाला आयुष्याचा खरा जोडीदार
बालपणी सुपरहिट ठरलेल्या ‘या’ कलाकारांना मोठेपणी मिळाले नाही अपेक्षित यश