×

बालपणी सुपरहिट ठरलेल्या ‘या’ कलाकारांना मोठेपणी मिळाले नाही अपेक्षित यश

हिंदी चित्रपट क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लहानपणापासूनच चित्रपट क्षेत्रात बालकलाकार म्हणून काम केले होते. यांमधले अनेक कलाकार मोठेपणीसुद्धा प्रचंड यशस्वी ठरले. मात्र बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम करूनही मोठे झाल्यावर मात्र अभिनय क्षेत्रात विशेष छाप पाडता आली नाही. काही कलाकारांना तर लहानपणी त्यांच्या भूमिकेला जोरदार प्रतिसाद मिळाला मात्र मोठेपणी ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकू शकले नाहीत. कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊ या.

आदित्य नारायण –

संगीतकार उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सलमान खानच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला होता. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. मोठे झाल्यानंतरही आदित्यने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. मात्र त्याला चाहत्यांची मने जिंकता आली नाहीत. आदित्यने टिव्हीमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसचालक म्हणून काम केले आहे.

इमरान खान –

अभिनेता इमरान खानने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. मोठे झाल्यानंतर इमरानने ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटात काम केले होते. मात्र लहानपणी आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या इमरानला मोठेपणी मात्र प्रेक्षकांची मने जिंकता आली नाहीत.

कुणाल खेमू –

अभिनेता कुणाल खेमूनेही बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. कुणालने आमीर खानच्या ‘राजा हिंदुस्थानी” चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटातील त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक कऱण्यात आले होते . मात्र मोठेपणी कुणालला त्याच्या अभिनयाची विशेष चुणूक दाखविता आली नाही. कुणालने ‘कलयुग’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती मात्र त्याला यश मिळाले नाही.

जुगल हंसराज –

अभिनेता जुगल हंसराजने ‘ मासूम’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.यामधील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र त्याला मोठे झाल्यानंतर अभिनयात विशेष छाप पाडता आली नाही. त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले नाही.

सना सईद –

शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. याच चित्रपटात सना सईदने काजोलच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मात्र मोठेपणी तिला अभिनयात विशेष यश मिळाले नाही. तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात काम केले होते.

आफताब शिवदासानी –

अभिनेता आफताबने बालकलाकार म्हणून ‘मिस्टर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातून पदार्पण केले होते. चित्रपटातील आफताबच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र त्याला मोठेपणी विशेष यश मिळू शकले नाही.

हेही वाचा –

‘एका जीवाचं वजन उचलतोय’ उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरीनंतरच्या स्त्रीच्या त्रासावरची पोस्ट व्हायरल

देवदासमधील चंद्रमुखी बनत माधुरीने हुनरबाजचा मंचावर पसरवला तिच्या नेत्रदीपक नृत्याचा जलवा

सोशल मीडियावर व्हायरल झाला शाहरुख खानचा नवीन लूक, फोटो पाहून फॅन्स म्हणाले ‘पठाण’चा नवीन लूक

Latest Post