सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्याची लावली वाट, ‘या’ लोकप्रिय कन्नड अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठीण

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करत असतात. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया करने या कलाकारांसाठी अगदीच सामान्य आहेत. मात्र प्रत्येक वेळी यश मिळत नाही आणि नंतर त्याचा फटका सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार स्वाती सतीशच्या बाबतीत घडला. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा (Swati Satish) चेहराही चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे खराब झाला असून, त्यानंतर तिला ओळखणे कठीण होत आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार अभिनेत्रीवर रूट कॅनल सर्जरी झाली होती, चुकीच्या उपचारांमुळे तिचा चेहरा खराब झाला होता. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

कन्नड अभिनेत्री स्वाती सतिशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण होत आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. उजव्या बाजूला, गालापासून ओठांपर्यंत खूप सूज आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री स्वातीने बंगळुरूमध्ये रूट कॅनल शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर काही वेळातच तिच्या चेहऱ्यावर सूज आली होती. सुजलेल्या चेहऱ्यावर खूप वेदना होत असल्याचं सांगण्यात येत आहे. बिघडलेल्या चेहऱ्याने तिला घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

याबद्दल अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, “बंगळुरूमध्ये तिच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि तिला उपचाराबाबत अपूर्ण माहिती आणि औषधे देण्यात आली, त्यामुळे तिचा चेहरा खराब झाला. अहवालानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान, तिला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक असिड देण्यात आले होते,” जेव्हा स्वाती उपचारासाठी दुसर्‍या रुग्णालयात पोहोचली तेव्हा ते आढळून आले. सध्या तिच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या चेहऱ्यात सुधारणा होत आहे.

खराब कॉस्मेटिक प्रक्रिया गंभीर असू शकतात आणि त्याचा फटका आयुष्यभर असू शकतो. शस्त्रक्रियेदरम्यान चेहरा खराब होण्याची ही पहिली बातमी नाही. याआधीही अनेक सेलेब्स अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचे बळी ठरले आहेत. गेल्या महिन्यात कन्नडची सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचाही प्लास्टिक सर्जरीच्या अपयशामुळे मृत्यू झाला होता. चेतना फक्त 21 वर्षांची होती, तिची बंगलोरमधील एका खाजगी रुग्णालयात फॅट-फ्री कॉस्मेटिक शस्त्रक्रिया झाली, जी तिच्यासाठी प्राणघातक ठरली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post