Friday, March 29, 2024

‘वेळेवर कारकुन येतात कलाकार नाही’ म्हणत राजेश खन्ना यांनी बिग बींच्या वक्तशीरपणावर केली होती टीका

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सिने जगतातील अभिनयाचे बादशहा म्हणून ओळखले जातात. बॉलिवूड जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या अमिताभ बच्चन यांनी अनेक दशके बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन जितक्या त्यांच्या अभिनयाइतकेच वक्तशीरपणाबद्दलही सर्वत्र लोकप्रिय आहेत. चित्रपटाच्या सेटवर अगदी वेळेत जाणारे कलाकार म्हणून त्यांचे खास कौतुक नेहमीच होत असते. पण यावरुनच अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यात वाद झाला होता. पाहूया काय आहे हे प्रकरण. 

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना शिस्त खूप आवडते आणि शूटिंगसाठी नेहमी वेळेवर पोहोचतात. असे कलाकार वेळला मौल्यवान मानतात. वेळेचे कौतुक करणाऱ्यांमध्ये पहिले नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचे आहे. अमिताभ बच्चन आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या सेटवर वेळेत येतात असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.अमिताभ बच्चन यांचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे की ते नेहमी चित्रपटांच्या सेटवर वेळेवर पोहोचतात आणि यामुळे अनेक वेळा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर स्टार्सना खूप त्रास सहन करावा लागतो. खरे तर अनेकदा त्याच्यासोबत काम करणारे इतर स्टार्स अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे वेळेवर चित्रपटाच्या सेटवर पोहोचत नाहीत.

बिग बी वेळेवर पोहोचल्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांना आनंद चित्रपटाच्या सेटवर खूप त्रास सहन करावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना चित्रपटांच्या सेटवर उशिरा येत होते. वीरेंद्र कपूरच्या ‘एक्सलन्स: द अमिताभ बच्चन वे’ या पुस्तकात त्यांनी एका मुलाखतीचा हवाला दिला होता की, राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांची शिस्तप्रियता आवडली नव्हती. “वक्तशीर लोक हे कारकून असतात कलाकार  नसतात असा त्यांचा विश्वास असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.”

गोविंदाने अमिताभ यांच्यासोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात काम केले तेव्हा तो खूप घाबरला होता. कारण त्यावेळी ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होते, त्यामुळे ते सेटवर उशिरा पोहोचायचे. बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन सध्या आपल्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्र, गुडबाय आणि द ग्रेट मॅन यांचा समावेश आहे. ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ अभिनेत्रीसोबत राजेश खन्नांना करायचे होते लग्न, नाते तुटल्यावर घरासमोरून काढली वरात
‘या’ अभिनेत्याने उडवली होती राजेश खन्ना यांची झोप, 100 चित्रपट करूनही मिळाले नाही यश

हे देखील वाचा