Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यु; ‘हे’ आहे तिच्या मृत्यूचे कारण

BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यु; ‘हे’ आहे तिच्या मृत्यूचे कारण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपट अभिनेता विजय राघवेंद्रच्या खूप जवळच्या वक्तीचे निधन झाले आहे. ही जवळची व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नी आहे. त्यामुळे अभिनेता फार दुखावला गेला आहे. त्याची पत्नी स्पंदना राघवेंद्रचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तिच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण राघवेंद्र कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विजय राघवेंद्र (Vijay Raghavendra) यांच्या पत्नीचा रक्तदाब कमी होता, त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव मंगळवारी बेंगळुरूला पोहोचण्यात येणार आहे. त्यांच बँकॉक येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ती कुटुंबासह थायलंडमध्ये असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

स्पंदनाने ‘या’ चित्रपटात केल होत काम
स्पंदना एका छोट्या भूमिकेत दिसली होती. रविचंद्रन यांच्या ‘अपूर्व’ या चित्रपटात त्यांची पाहुणी म्हणून ती दिसली होती. राघवेंद्र आणि पत्नी स्पंदना या महिन्यात त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करणार होते. दोघांनी 2007 मध्ये लग्न केले आणि दोघांना शौर्य नावाचा मुलगा आहे. ‘चिन्नारी मुथा’ मधील अभिनेता विजय राघवेंद्रची भूमिका लोकांना आवडली. त्यामधील अभिनेत्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले असून या चित्रपटासाठी विजय राघवेंद्र यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

विजय राघवेंद्र यांनी 1982 मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 मध्ये आलेल्या निनागी या चित्रपटात त्यांनी पहिली मुख्य भूमिका केली होती. विजय राघवेंद्र सध्या बंगळुरूमध्ये आहेत. कन्नड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते तिथे गेले होते. मात्र पत्नीच्या निधनामुळे चित्रपटाचे प्रमोशन थांबवण्यात आले आहे. त्याचा हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा- 
जबरा फॅन! भारतीय जवानने किरण मानेंसाठी केले ‘ते’ कृत्य; अभिनेता म्हणाला, “काळीज…”
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय; वैदेही परशुरामी ग्लॅमरस अदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा