Monday, October 2, 2023

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया; म्हणला, ‘माझी आई आणि मावशी…’

मराठी चित्रपट सृष्टीत एकापेक्षा एक भन्नट चित्रपट येत आहेत. काही दिवसांपुर्वी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आला आहे. या चित्रपटने जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. हा चित्रपट अनेक कलाकारांनी आणि राजकीय नेते मंडळींनी बघितला आहे. नुकताच हा चित्रपट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बघितला आहे. त्यावर त्याने त्याच्या मत मांडले आहे.

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट 28 मे 2021 रोजी चित्रपटत गृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत. केदार शिंदे यांनी राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासाठी एका खास शोचे जोरदार आयोजन केले होते.

 या शोला सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली देखील आली होती. हा चित्रपट बघितल्यानंतर सचिनने एक ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे सचिन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सचिनने ट्विट करत चित्रपटचा अनुभव शेअर केला आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा क्रिकेटचा “देव”… “बाईपण भारी देवा” सिनेमा पहातो… श्री स्वामी समर्थ महाराज की जय”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

सचिनने ट्विट करताना लिहिले की, “‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. हा मराठी चित्रपट पाहून मी भाराहून गेले आहे. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. मी, माझी आई आणि मावशीबरोबर हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याबरोबरच या चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटता आलं, हा देखील एक भारी क्षण होता.” त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sachin Tendulkar gave his reaction after watching the movie Baipan Bhari Deva)

अधिक वाचा- 
‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितच्या स्थळाला नाही म्हणाले होते सुरेश वाडकर, कारण वाचून व्हाल थक्क
कार्पोरेट लूक आणि ग्लॅमरस पूजा हेगडे, फोटो पाहून चाहत्यांचे हरपले भान

हे देखील वाचा