Monday, October 2, 2023

जबरा फॅन! भारतीय जवानने किरण मानेंसाठी केले ‘ते’ कृत्य; अभिनेता म्हणाला, “काळीज…”

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे कलाविश्वापासून समाजापर्यंत कोणतीही एखादी घटना घडली की, त्यावर उघडपणे ते भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ते कायम चर्चेत येत असतात. दरम्यान आता किरण माने लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ते कलर्स मराठीवर दाखल होत असलेली नवीन मालिका ‘सिंधूताई माझी आई‘मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

किरण माने  (Kiran Mane) यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही आहे. त्यांनी एका चाहत्यांची पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या चाहत्याला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे. किरण माने यांनी पोस्ट केला आणि ती व्हायरल झाली नाही असे होत नाही. किरण माने यांनी नुकतीच केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “काश्मीरजवळ बॉर्डरवर आपल्या देशाच्या सुरक्षेत तैनात असलेला जवान आपला ‘डाय हार्ड फॅन’ असतो… ‘मुलगी झाली हो’ असो नायतर ‘बिग बॉस’, त्यानं आपल्या कुठल्याच कार्यक्रमाचा एकही एपिसोड कधी चुकवलेला नाही… फेसबुकवरच्या आपल्या प्रत्येक पोस्टचीही तो तेवढ्याच उत्सुकतेने वाट पाहतो… वर्षभरानंतर सुट्टी मिळाल्या-मिळाल्या गांवाकडे येऊन पहिल्यांदा ‘किरण माने कुठे शूटिंग करताहेत?’ याचा शोध घेऊन आपल्याला भेटायला येतो… तेव्हा काळीज किती भरून येतं हे मी शब्दांत नाय सांगू शकत भावांनो!”

संग्राम शेटे हा जवान सहकुटूंब मला भेटायला आला… त्याच्यामुळे त्याचे कुटुंबीयही माझे फॅन झालेत. त्याचा मुलगा तर जणू खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे येऊन मांडीवर बसला… काय काय सांगू असं झालंवतं त्याला… बाबांनी येताना काय गिफ्टस् आणल्यात, तुम्ही बिग बॉसमध्ये अमुक टास्क जिंकला तेव्हा आम्ही कसा जल्लोष केला… त्या तिघांच्याही चेहर्‍यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहताना मी भारावून गेलो होतो…,” असा अनुभव माने यांनी या पोस्ट माध्यमातून सांगितला आहे. (actor Kiran Mane has shared her experience of meeting this Jabra fan)

अधिक वाचा- 
तमन्ना अन् विराट कोहली रिलेशनशिपमध्ये? दाेघांचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल
संगीतसृष्टीवर शोककळा: संगीतजगतातील ‘या’ लोकप्रिय गायकाचे दुःखद निधन

हे देखील वाचा