मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही (Ajinkya Raut) दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.
दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ऋतिक रोशनला ‘क्रिश 4’ बनवण्यात अडचणी, अभिनेत्याने शेअर केले चित्रपटाचे मोठे अपडेट
अभिनेत्री एमी जॅक्सनच्या बॉयफ्रेंडने फिल्मी अंदाजात अभिनेत्रीशी केली एंगेजमेंट, सोशल मीडियावर रोमँटिक फोटो व्हायरल