Monday, July 1, 2024

हनी सिंग अन् नेहा कक्करची धमाकेदार जुगलबंदी, तर जोडीला टोनी कक्करची साथ; ‘कांटा लगा’ गाणं झालं हिट

नेहा कक्कर, हनी सिंग आणि टोनी कक्कर हे तिन्ही स्टार एकत्र एखाद्या गाण्यात झळकावे असे अनेक चाहत्यांना वाटत होते. नेहा आणि हनी सिंगचे ‘सनी सनी’ हे गाणे चाहत्यांना खूप आवडले होते. त्या दोघांनी गाण्याला पूर्ण न्याय दिला होता. त्यामुळे त्यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नवीन गाण्याची वाट पाहत होते. परंतु आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण नेहा, हनी सिंग आणि टोनी कक्कडचं ‘कांटा लगा’ हे गाणं बुधवारी (८ सप्टेंबर)ला प्रदर्शित झालं आहे.

या तिघांनी या गाण्यामध्ये चांगलाच धमाका केला आहे. तिघांनी एकमेकांना पूर्णपणे साथ दिलेली आहे. त्यांच्या या गाण्याला चाहत्यांचे चांगलेच प्रेम देखील मिळत आहे. सर्वत्र सध्या त्यांच्या या धडाकेबाज गाण्याचीच चर्चा सुरु आहे. यामध्ये नेहा डान्स करताना देखील दिसत आहे. तसेच या गाण्याचे शब्द चाहत्यांना वेड लावत आहेत. रविवारी (५ सप्टेंबर) रोजी या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासून हे संपूर्ण गाणे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता हे गाणं ‘देसी म्युजिक फॅक्टरी’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. (Kanta Laga song become popular as soon as it was released)

काही दिवसांपूर्वी हनी सिंग त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे त्याचे चाहते देखील त्याच्यावर नाराज होते. परंतु नंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्याची पत्नी त्याच्या घरून तिची सर्व मालमत्ता घेऊन गेली. यावर हनीने कुठलाही आक्षेप घेतला नाही. तसेच आता त्याचे हे नवीन गाणे प्रदर्शित झाल्याने सध्या त्याचे चाहते देखील आनंदी आहेत.

खरंतर हे गाणं २ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार होतं. परंतु सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे, त्यांनी हे गाणं तेव्हा प्रदर्शित केलं नाही. कारण त्यावेळी सर्व जण दुःखात होते. ६ सप्टेंबरला सिद्धार्थच्या आईने एक प्रार्थना सभा आयोजित केल्याने सर्वांच्या मनावरली दुःख थोडे कमी झाले. त्यामुळे ‘कांटा लगा’ हे गाणं बुधवारी प्रदर्शित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा