Monday, July 1, 2024

‘कांतारा’च्या यशानंतर अभिनेता पोहोचला रजनीकांतच्या घरी, रिषभ शेट्टी व थलायवा भेटीचा फोटो व्हायरल

सध्या बॉक्स ऑफीसवर एकाच चित्रपटाचा बोल बाला सुरु आहे तो म्हणजे ‘कांतारा‘. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे सोडले आहे. कंतारने बाकीच्या चित्रपटांसाठी नवीन रेकॉर्ड उभा केला आहे. कांताराच्या अफाट यशाने रिषभ शेट्टी(Rishabh Shetty) संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे. बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंतच्या दिग्गज कलाकारांनाही त्यांच्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची प्रशंसा केली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा देव म्हटल्या जाणाऱ्या रजनीकांतनेही ‘कांतारा’ पाहिल्यानंतर रिषभ शेट्टीचे कौतुक केले आणि आता त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राजकांतसोबतच्या भेटीच्या फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवर फोटो शेअर करण्यासोबतच रिषभने रजनीकांत यांचे आभार मानणारी एक चिठ्ठीही लिहिली आहे. पहिल्या फोटोमध्ये ऋषभ रजनीकांत यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांच्या हातात हात घालून हसताना दिसत आहेत. तिसऱ्या चित्रात दोघेही एकत्र बसून बोलत आहेत. ऋषभला होस्ट केल्यानंतर रजनीकांत यांनी शाल घालून त्याचा गौरव केला. या फोटोला त्याने “तुम्ही एकदा आमची प्रशंसा केली. आम्ही शंभर वेळा तुमची स्तुती करू”, असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमधील रिषभ रजनीकांतच्या पाया पडत असल्याच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

फोटोवर प्रतिक्रिया देत एका चाहत्याने लिहिले की, ‘तू किती धन्य आहेस .तुला थेट थलायवा यांना भेटण्याची संधी मिळाली. तुझ्या सर्व पुढील प्रोजेक्टसाठी तुला शुभेच्छा. चित्रपट काय आहे? त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ऋषभ सर, तुमच्याकडून अशाच आणखी चांगल्या चित्रपटांची वाट पाहत आहे.’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

नुकतेच रजनीकांतने ‘कंतारा’साठी ऋषभचे कौतुक केले होते. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी लिहिले की, ‘कांतारा चित्रपट पाहताना माझ्या अंगावर काटे आले. लेखक व दिग्दर्शक म्हणून तू उत्तम कामगिरी केली आहेस. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असं ते म्हणाले होते. रजनीकांतच्या या पोस्टला उत्तर देताना रिषभने लिहिले, ‘प्रिय रजनीकांत सर तुम्ही भारतातील सर्वात मोठे सुपरस्टार आहात आणि मी लहानपणापासून तुमचा चाहता आहे. तुमच्या कौतुकामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. धन्यवाद साहेब.’

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रूथ प्रभू करतीये ‘या’ गंभीर आजाराचा सामना, फोटो शेअर करत दिली माहिती
अच्छा ! तर ही आहे रणदीप हुड्डाची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरून फोटोने माजवली खळबळ

हे देखील वाचा