Thursday, July 18, 2024

समंथा रूथ प्रभू करतीये ‘या’ गंभीर आजाराचा सामना, फोटो शेअर करत दिली माहिती

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ऊ अंटवा’ गाण्यापासून समंथाला खूप लोकप्रियता मिळाली. अशा परिस्थितीत अभिनेत्रीशी संबंधिक अपडेट तिचे चाहते ठेवतात. यादरम्यान समांथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली.

समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘यशोदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिला आहे. अशा परिस्थितीत समांथाने पोस्ट शेअर करताना प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ती लिहिते, ‘यशोदाच्या ट्रेलरला तुमचा प्रतिसाद जबरदस्त होता. मी हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच हेच प्रेम माझ्या जीवण्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते.

 

View this post on Instagram

 

सामंथा पुढे लिहिते, ‘काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस नावाचा एक ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन. मी शारीरिक आणि मानसिकरित्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा अनुभव घेत आहे. जेव्हा वाटतं की आता हे आणखी एक क्षणही सहन करू शकत नाही तेव्हा क्षण निघूनही जातो. याचा अर्थ असाच आहे की मी ठीक होण्याच्या जवळपास आहे. खूप सारं प्रेम…”

यामध्ये ती तिच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसत असून तिच्या हाताच्या नसांमध्ये सलाईन लावलेली दिसत आहेत. यादरम्यान समंथाने तिच्या दोन्ही हातांनी हार्टचे चिन्ह बनवले आहे. तिचा हा जोश पाहून चाहतेही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. कामाबद्दल बोलायचं तर ती ‘यशोदा’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फॅमिली मॅन 2’ आणि ‘पुष्पा’मध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अच्छा ! तर ही आहे रणदीप हुड्डाची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरून फोटोने माजवली खळबळ

नोव्हेंबर ठरणार हाऊसफुल, ‘या’ धमाकेदार वेब सिरीज होणार प्रदर्शित

हे देखील वाचा