Monday, June 9, 2025
Home अन्य ‘कांतारा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

‘कांतारा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

गेलं वर्ष दक्षिणात्य चित्रपटांसाठू खूपच आनंदाचं ठरलं, कारण सर्वत्र दक्षिण चित्रपटाचाच गावाज होता. ‘केजीएफ चॅप्टर 2‘, पुष्पा, कांतारा, आरआरआर सरख्या गाजणाऱ्या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बॉलिवूडकरांचे चित्रपट या चित्रपटांसमोर फ्लॉप ठरले. 2020 या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला कांतारा या कन्नड चित्रपटाने जगभरातील लोकांवर भुरळ घातली आहे. कमी बजटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात छप्परफाड कमाइ केली आणि चित्रपटाचा दिग्दर्शक आणि आभिनेता रातोरात स्टार बनला.

कांतारा (Kantara) चित्रपट दिग्दर्शक रिषभ शेट्टी (Rishab Shetty) याने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय स्वत: केलं आहे त्यामुळे अभिनेत्याचे जगभरात कौतुक झाले. कांतारा चित्रपटामधील रिषभ शेट्टी सोबत मुख्य अभिनेत्री सप्तीमी गौडी (Sapthami Gowda) हिला देखिल चांगली प्रसिद्धी लाभली आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांमध्ये एंट्री मिळणार आहे. सप्तमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कांतारा चित्रपटामुळे अभिनेत्रीला अमाप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे अभिनेत्रीसाठी आणि इंडस्ट्रीसाठी ही खूपच अभिनस्पद गोष्ट आहे.

काश्मीर फाईल्स‘ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना सप्तीमीच्या अभिनयाने भुरळ घातली आहे. यांचा आगामी येणारा ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड केली आहे. त्याशिवाया सप्तमी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सप्तमीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून विवेक अग्निहोत्री यांनी देखिल त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट शेअर अभिनेत्रीचे नव्या प्रोजेक्टमध्ये स्वागत केलं आहे. तयासाठी अभिनेत्रीदेखिल विवेकजींचे आभार मानले आहेत.

विवेकजींनी चित्रपट जाहिर केल्यापासून त्यांच्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट (दि, 15 ऑगस्ट) रोजी म्हणजेच 11 महिन्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्तीमी शिवाय या चित्रपटामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) , आणि अनुपम खेर (Anupam Kher) हे दिग्दज कलाकार या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आदिल दुर्रानीने लग्नाला दिला नकार, राखी सावंतची कॅमेऱ्यासमोर रडारड
‘आधी भारतीय संस्कृती शिका मग मला…’,उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर

हे देखील वाचा