Wednesday, December 6, 2023

‘या’ कारणामुळे सलमान खानवर प्रचंड भडकले होते नाना पाटेकर; म्हणाले, ‘…त्याची लायकी नाहीये’

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानची फॅन फॉलोविंग देखील प्रचंड आहे. त्याचा चित्रपट फ्लॉप जरी ठरला तरी तो 100 कोटीच्या घरात कमाई करतो, यावरून आपण त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज सहज लावू शकतो. तर दुसरीकडे नाना पाटेकरही (Nana Patekar) त्यांच्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त पर्सनल लाईफमुळेही बऱ्याचदा चर्चेचा विषय राहिले आहेत.  रविवारी (1 जानेवारी) नाना त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त तो किस्सा जाणून घेऊया, जेव्हा सलमानच्या एका वक्तव्यामुळे नाना पाटेकर त्याच्यावर प्रचंड संतापले होते.

सलमानने केलं होतं पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन
हे संपूर्ण प्रकरण 2016 सालचं आहे. उरी येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या कामामुळे बराच गोंधळ उडाला होता. मात्र, सलमानने पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवला. यामुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ निर्माण झाला आणि लोकांनी सलमानवर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी सलमान म्हणाला होता की, “पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत, त्यांना इंडस्ट्रमध्ये काम करण्यापासून रोखू नका.” (when nana patekar was very angry at salman khan)

नाव न घेता साधला निशाणा
सलमान खानच्या या विधानावर नाना पाटेकर नाराज झाले. नाना पाटेकर यावर त्यांची प्रतिक्रिया देत म्हणाले की, “आपले सर्वात मोठे हिरो आपले जवान आहेत. आपण सर्वसाधारण लोक आहोत. आम्ही जे बोलतो, त्यावर जास्त लक्ष देऊ नका. जे पटर पटर बोलतात, त्यांची लायकी नाहीये इतकं महत्त्व देण्याची.” यानंतर सलमानचं नाव न घेता नाना पाटेकर म्हणाले की, “मी त्याविषयीच बोलत आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करत आहात.”

‘सर्वात आधी माझा देश आहे’
त्यानंतर नाना पाटेकर यांनी पाकिस्तानी कलाकारांसाठी म्हटले होते की, “सर्वात आधी माझा देश आहे. देशाव्यतिरिक्त मी कोणालाही ओळखत नाही आणि मला जाणून घ्यायलाही आवडणार नाही. कलाकार हे देशासमोर छोट्यामोठ्या किड्यासारखे आहेत. आपल्याला काहीच किंमत नाही. आधी माझा देश आहे.” त्यावेळी अभिनेता अजय देवगणनेही भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर असलेल्या बंदीचे समर्थन केले होते. “राष्ट्रासोबत उभे राहण्याची वेळ आली आहे.” असे म्हणत त्याने समर्थन दर्शवले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लग्नानंतर देवोलिना विशाल सिंहसोबत दिसली रोमँटिक अंदाजात; युजर्स म्हणाले, ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’

‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’, नाना पाटेकरांनी सांगितली ‘या’ अभिनेत्रीसोबतची लवस्टोरी

हे देखील वाचा