Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड कॉमेडियन कपिलचा रोमांटिक अंदाज पाहून चाहतेही म्हणाले, ‘वन्स मोर’

कॉमेडियन कपिलचा रोमांटिक अंदाज पाहून चाहतेही म्हणाले, ‘वन्स मोर’

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा नेहमी आपल्या धमाकेदार कॉमेडीने हसवत असतो. तो पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाचा धमाकेदार सिजन घेऊन सगळ्यांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गाणेही चांगले गातो मात्र, कपील यावेळेस जरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे कपिलचा रोमांटिक अंदाज. कपिलने 2018 साली अनेक दिवसापासून डेट केलेली गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत लग्न बंधनात अडकला होता. तो नेहमी आपल्या पत्नीसोबत मजाक मस्ती करतानाच पाहिले आहे, पण यावेळेस दिवाळीच्या पार्टीमध्ये कपील जरा रोमांटिकच झाला होता.

कपिल शर्मा (Kapil Sharma) याने आपली पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) सोबत नुकतंच कृष्णन कुमार यांच्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या अनेक कलाकारंनी या पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवली होती. मात्र, कपीलने या पार्टीमध्ये मीडियासमोर असे काही केले की सगळ्यांच्या काय तर त्याच्या पत्नीचाही भुवया उंचावल्या होत्या. नेहमी आपल्या पत्नीसोबत मजाक करत असलेल्या कपिलने अचानक रोमांटिक मुडमध्ये येऊन त्याने सगळ्यांसमोर त्याच्या पत्निला किस केले, असे करत असताना चक्क गिन्नी देखिल हैराण होत. कपिलच्या रोमांटिक अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कपिलचा असा रोमांटिक अंदाज पाहून तेथील जमलेले व्यक्ती वन्स मोर म्हणतात, तेव्हा कपिल लाजतो आणि पुढे जातो. या व्हिडिओमध्ये कपीलने पांढऱ्या रंगाचा कर्ता परिधान केला होता आणि त्याची पत्नी गिन्नी हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि गुलाबी रंगाची ओढणी घेतली होती. कपिलने एकदम स्टइलमध्ये चश्मादेखिल लवला होता. त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कॉमेडियन कपिल याचे आणि गिन्नीचे नाते कॉलेजपासून होते यांनत या दोघांचा 2018 साली पंजाबच्या जलंद गावामध्ये   शुभ विवाह पार पडला. या लग्नामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. 2019 साली या जोडप्याच्या घरी मुलीचा जन्म झाला आणि यांनतर 2021 साली मुलाचा जन्म झाला. यांच्या मुलिचे नाव अनायरा ठेवले असून मुलाचे नाव त्रिशान ठेवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत दिसली जान्हवी कपूर, ब्रेकअपनंतर पुन्हा येणार एकत्र?
एम एस धोनी करतोय चित्रपटात आगमन, बॉलिवूड नाहीतर साउथमध्ये करणार पदार्पण

हे देखील वाचा