Tuesday, July 23, 2024

एम एस धोनी करतोय चित्रपटात आगमन, बॉलिवूड नाहीतर साउथमध्ये करणार पदार्पण

भारताचा दमदार क्रिकेट पटू पूर्व कर्णधार आणि बल्लेबाज महेंद्रसिंग धोनी याने भारताला अनेक ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत. तो सोशल माडियावर नेहमी सक्रिय असतो. तो दरवेळेस काहीतरी नवीन कण्याचा प्रयत्न करत असतो. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी नवीन फिल्म प्रोडक्शन सुरु केले आसून साउथ इंडस्ट्रीमध्ये एंन्ट्री करणार आहेत.

भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान महेद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने एका जाहिरातीमध्ये सांगितले होते की, तो लवकरच आपले तमिळ इंडस्ट्रीमध्ये लवकरच आपले फिल्म प्रोडक्श सुरु करणार आहे. हा निर्णय दोघेही पती पत्नीचा असून साक्षीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. तिने एक कौटुंबिक चित्रपटाचा आराखडा तयार केला असून पारिवारिक चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी करणार आहेत. त्यांनी यापूर्वी अथर्व- द ओरिजिन नावाची कादंबरी देखिल लिहिली आहे. लवकरच या चित्रपटाच्या कलाकार आणि क्रू यांची घोषणा केली जाईल.

या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितले की, “जेव्हा मी साक्षीने लिहिलेल्या कॉनसेप्टला वाचले तेव्हा मला खूपच भारी वाटले. ही स्टोरी नवीन होती, आणि यामध्ये कौटुबिक मनोरंजन करण्याची पूर्ण क्षमता होती.” क्रिकेटर धोनी याने मनोरंजन क्षेत्रामधील अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनसोबत फिक्शन, क्रइम ड्रामा, कॉमेडी, सस्पेंस थ्रिलर, सोबत अनेक शैलिमध्ये कंटेट बनवण्याची तयारी सुरु केली आहे.

धोनीने आपल्या पत्नीसबत मिळून हे प्रोडक्शन हाउस तयार केले आहे. हे प्रोडक्शन हाउस पूर्णपणे तयार असून लवकरच नवीन चित्रपट घेउन येणार आहे. पहिल्या तामिळ चित्रपटाची स्टोरी तयार असून कलाकार आणि क्रूच्या तयारीत आहेत. यांच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
असा असतो किंग खानचा विकेंड, सगळं काही चांगलं करूनही खावा लागतो पत्नीचा ओरडा
कसं पकडलं गौरीनं शाहरुख अन् प्रियांकाचं लफडं? एका क्लिकवर घ्या जाणून

हे देखील वाचा