Wednesday, February 21, 2024

ही दोस्ती तुटायची नाय! कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी पुन्हा एकत्र; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा

काॅमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा अनेक दिवसांपासून छोट्यापडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल‘मध्ये जेव्हा सुनील ‘डॉक्टर’ म्हणून यायचा तेव्हा शो पाहण्याची मजा द्विगुणित व्हायची. मात्र, त्यानंतर दोन्ही कलाकारांमध्ये मारामारी झाली. त्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्या वेगळ्या वाटेला गेला. असे असूनही, दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.

कपिल आणि सुनील ( Sunil Grover) या दोघांनी सोशल मीडियावर कमबॅक करण्याची घोषणा केली आहे. कपिलने (Kapil Sharma)  इंस्टाग्रामवर त्याच्या शोचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करताना त्याने लिहिले की, “मन लावून बसा, ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आला आहे. नेटफ्लिक्सवरील एका नवीन शोमध्ये आम्ही एकत्र आलो आहोत.” शोमध्ये अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक , राजीव ठाकूर आणि अनुकल्प गोस्वामी हे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करतील, जे व्हिडिओमध्ये देखील दिसत आहेत.

प्रोमोमध्ये सुनील आणि कपिलने फ्लाइटमधील त्यांच्या भांडणाचाही उल्लेख केला आहे. ते दोघे एकत्र परतत असल्याचे कपिलचे म्हणणे आहे. तेव्हा सुनीलने त्याला ऑस्ट्रेलियात राहू द्या असा टोमणा मारला. मग तो असेही म्हणतो की, यावेळी तो विमानाने नाही तर रस्त्याने जाणार आहे. कपिलने काही दिवसांपूर्वीच त्याच्या शोची घोषणा केली होती. त्याने सांगितले होते की, शोमध्ये फॉरमॅटपासून घरापर्यंत बरेच बदल होतील, परंतु मंडळ तेच राहील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

दरम्यान,’ द कपिल शर्मा शो’मध्ये ‘डॉक्टर मशूर गुलाटी’ची भूमिका साकारून सुनीलही प्रसिद्ध झाला. त्याच्या एक्झिटमुळे शोच्या टीआरपीवर मोठा परिणाम झाला. दोघांमधील वाद खूप चर्चेत होता. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाहून येत असताना फ्लाइटमध्ये सुनील आणि कपिलमध्ये भांडण झाल होते. असे म्हटले जाते की, कपिलने रागाच्या भरात सुनीलवर हातही उचलला होता. याच कारणामुळे सुनीलने त्याचा शो सोडला होता.

आधिक वाचा-
‘चंद्रमुखी’च्या वादावर अमृता खानविलकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘वृत्ती कधीच…’
‘अ‍ॅनिमल’च्या वादळात उडून गेला ‘सॅम बहादुर’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई

हे देखील वाचा