Monday, February 26, 2024

‘अ‍ॅनिमल’च्या वादळात उडून गेला ‘सॅम बहादुर’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई

अ‍ॅनिमल‘ हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटातील बॉबीचे पात्र खूप चांगलेच चर्चेत आले आहे. तर विक्की कौशलने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहेत. लोक विक्कीला थिएटरमध्ये पाहण्यासाठी थांबतात. पण, त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सॅम बहादूर‘ हा चित्रपट त्याच्या चाहत्यांची निराशा करत आहे. बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या अ‍ॅनिमलसमोर हा चित्रपट अपयशी ठरला आहे. मात्र, या दोन्ही सुपरस्टारच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये टक्कर होत असल्याचे दिसत आहे. सॅम बहादूरने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर‘कडून (sam bahadur) प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण, पहिल्याच दिवशी चित्रपटाने आश्चर्यकारक कलेक्शन केले आहे. ‘सॅम बहादूर’ने पहिल्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली आहे. तर हा चित्रपट 55 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. मात्र, या वर्षी विकीचे ( Vicky Kaushal) आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने 5.49 कोटींचा व्यवसाय केला आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 1.4 कोटींचा व्यवसाय केला.

1 डिसेंबरला, रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलसह, विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ देखील थिएटरमध्ये आला. पण, दोन्ही चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनमध्ये खूप फरक होता. ‘सॅम बहादूर’चे कलेक्शन त्याच्या आधीच्या दोन चित्रपटांच्या ओपनिंगपेक्षा चांगले होते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात तब्बल 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण ‘अ‍ॅनिमल’च्या तुलनेत हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाकडून निर्मात्यांना अजूनही खूप आशा आहेत. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, गोविंद नामदेव आणि मोहम्मद जीशान अय्युब महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘सॅम बहादूर’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन फार चांगले नसावे पण विकी कौशलच्या अभिनयाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ‘सॅम बहादूर’ व्यतिरिक्त बॉक्स ऑफिसवर ‘टायगर 3’ आणि ‘अ‍ॅनिमल’ देखील आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Now sam bahadur will fall heavily on Ranbir Animal Earned so many crores on the first day)

आधिक वाचा-
ना कोणता चित्रपट, ना अभिनयात कुशल, तरीही सोशल मीडियावर यांचाच बोलबाला
‘चंद्रमुखी’च्या वादावर अमृता खानविलकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘वृत्ती कधीच…’

हे देखील वाचा