Wednesday, August 6, 2025
Home टेलिव्हिजन अर्रर्रर्र! दुबईमध्ये फ्लर्ट करणं कपिल शर्माला पडलं भलतंच महागात, महिलेने थेट…

अर्रर्रर्र! दुबईमध्ये फ्लर्ट करणं कपिल शर्माला पडलं भलतंच महागात, महिलेने थेट…

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’ या शोमुळे देशातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा शोमध्ये अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करताना दिसतो. शोमधील त्याची ही फनी स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडते. अलीकडेच त्याची ही दिलफेक स्टाइल परदेशातही पाहायला मिळाली, जी त्याला चांगलीच महागात पडली. कपिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुबईत महिलेसोबत फ्लर्ट करताना दिसला कपिल
कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ दुबईमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कपिल महिलेला इम्प्रेस करण्यासाठी मोठमोठ्या बाता मारत आहे. या क्लिपमध्ये कपिल एका आलिशान कारजवळ उभा आहे आणि आपल्या श्रीमंतीचे खोटे किस्से एका महिलेला सांगत आहे. (kapil sharma flirting on the streets of dubai funny video goes viral)

यानंतर ती महिला त्याच्या बोलण्याने प्रभावित होते आणि गाडीत बसते. यानंतर कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना तिथे पोहोचते आणि त्याचे भांडे फोडते. सुमोनाचे बोलणे ऐकून त्या महिलेला इतका राग येतो की, तिने कपिलला चापट मारते. खरं तर, जागतिक हास्य दिनानिमित्त कपिलने हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

शोमध्ये दिसणार ‘भूल भुलैया २’ची टीम
या आठवड्यात ‘भूल भुलैया २’ची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. अलीकडेच कपिलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये चित्रपटाचे मुख्य कलाकार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि दिग्दर्शक अनीस बज्मी दिसले.

चाहते या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा