Sunday, January 18, 2026
Home अन्य ‘मी रागात शिव्या देतो, मी संत नाहीये’, जेव्हा आपल्या रागावर कॉमेडियन कपिल शर्माने दिले होते स्पष्टीकरण

‘मी रागात शिव्या देतो, मी संत नाहीये’, जेव्हा आपल्या रागावर कॉमेडियन कपिल शर्माने दिले होते स्पष्टीकरण

कॉमेडीचा बादशहा अशी ज्याची सर्वत्र ओळख आहे तो म्हणजे कपिल शर्मा. कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडीमुळे सर्वत्र ओळखला जातो. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ तर खूपच लोकप्रिय झाला आहे. कपिल शर्माबाबत ही गोष्ट खूपच कमी जणांना माहीत असेल की, कपिल शर्मा जेवढा हसतो आणि हसावतो तेवढाच त्याला भयंकर राग देखील येतो. काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने एका पत्रकाराला चांगलेच सुनावले होते.

त्यावेळी कपिल शर्माचा असा आरोप होता की, तो पत्रकार जाणूनबुजून त्याचे नाव खराब करत आहे. त्याने सहा महिन्यात कपिल शर्मा विरोधात 160 आर्टिकल छापले होते. कपिलच्या मते ते सगळे आर्टिकल खोटे होते. त्यावेळी कपिल शर्माने ट्विटरवर त्या पत्रकाराला चांगलेच सुनावले होते. एवढंच काय तर काही अपशब्द देखील काढले होते.

कपिलने या‌ घटनेनंतर त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्यावेळी मी जी भाषा वापरली ती चांगली नव्हती. मी रागात नको ते बोलून गेलो. पण मी त्या वेळेस खूप डिप्रेशनमध्ये होतो. तसेच दारू देखील पित होते. जेव्हा माणूस नशेत असतो, तेव्हा त्याच्याकडून अशा गोष्टी घडतच असतात.”

याच मुलाखतीत त्याने पुढे सांगितले की, “जेव्हा मला राग येतो, तेव्हा माझ्या तोंडून अपशब्द बाहेर येतात. भविष्यात जर माझ्या सोबत असं परत कधी झालं तरीही मी अशाच प्रतिक्रिया देईल. मी कोणी संत नाहीये.”

‘द कपिल शर्मा शो’ जानेवारीमध्ये ऑफ एअर झाला होता. कारण कपिल शर्मा हा बाबा झाला आहे. त्यामुळे तो सुट्टीवर होता. एप्रिल महिन्यात या शोची शूटिंग सुरू होणार होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शूटिंग रद्द करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला ‘या’ कारणामुळे करायचे नव्हते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम

-अंडरवर्ल्डच्या नावाने उडायचा बॉलिवूडचा थरकाप! राकेश रोशन यांच्यावर झाडल्या होत्या २ गोळ्या; ‘या’ गोष्टीमुळे नाराज झाला होता अबू सालेम

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा