Monday, April 15, 2024

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

कंगना रणौत नेहमीच तिच्या स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखली जाते. मित्र शत्रू कोणामध्ये देखील तिला खटकलेली बाब ही ती थेट तोंडावर सांगते. तिच्या या स्वभावामुळे बॉलिवूडमध्ये तिला मित्र कमी आहेत. खूप कमी लोकांना ती आवडते आणि तिला देखील खूप कमी लोकं आवडतात. एक नक्की ती तिची मैत्री एकदम प्रामाणिकपणे निभावत असते. कंगना आणि माधवन यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे.या दोघांनी दोन चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान माधवनने कंगनाचे खूपच कौतुक केले आहे.

कंगना आणि माधवन हे पहिल्यांदा ‘तनु वेड्स मनू’ सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर हे दोघं ‘तनु वेड्स मनू रिटर्न’मध्ये देखील दिसले. आता मुलखातीमध्ये माधवानने कंगनाचे जोरदार कौतुक करत तिला एक स्ट्रॉंग स्त्री म्हटले आहे. माधवनला कंगनाच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “आपण जर कंगनाच्या सर्व चित्रपटांच्या मुख्य नायिका पाहिल्या तर त्या खूपच मजबूत आहेत. कंगनाला स्वतःच्या घरात काही अतिशय मजबूत महिलांसोबत वाढण्याचे भाग्य लाभले. कंगना किंवा मला ज्या महिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व स्वतःची मतं परखडपणे मांडणाऱ्या स्त्रिया होत्या किंबहुना आहेत.”

पुढे माधवन म्हणाला, “कंगना एक पुशओव्हर आणि स्टिरियोटाइप अभिनेत्री नाही. ती काही चित्रपटात येते नाचते आणि अभिनेत्याकडून मार खाऊन निघून जाते अशा प्रकारचे काम करणारे लोकं मूर्ख असतात. मात्र ती अशी नाही. कंगना एक वेगळी अभिनेत्री आहे जी तिच्या पात्रासाठी खूप मेहनत घेते. ती चित्रपटाच्या पडद्यावर सर्व प्रकारची भूमिका साकारते आणि याचे मला अप्रूप आहे. ती खूपच स्मार्ट आणि आपल्यासाठी महत्वाची अशी व्यक्ती आणि अभिनेत्री आहे.”

दरम्यान आर माधवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘रॉकेट्री’ सिनेमात दिसला होता. आता तो ‘नायडू’ सिनेमात झळकणार आहे, तर कंगना रणौत लवकरच तिच्या ‘इमरजेंसी’ सिनेमात दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल

अर्चना गौतम कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हे देखील वाचा