Monday, May 27, 2024

‘तू बॉलिवूडची सीमा आंटी आहेस’, म्हणत ‘या’ अभिनेत्रीने करण जोहरला दाखवला आरसा

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर म्हणजेच बॉलिवूडचा ‘माफिया’ आशा अनेक नावांनी त्याला ओळखलं जातं. बॉलिवूडमध्ये सगळ्यांची पोल खो करणं, नेपोटिझम, कलाकारंच्या जोड्या जुळवून देणं अशा अनेक कारणांसाठी तो बॉलिवूडमध्ये करण खूप प्रसिद्ध आहे मात्र, हे सगळं करणं त्याचा छंद आहे. त्याने खूप वेळेस आपल्या छंदाचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा माफिया म्हणून ओळखला जाणारा करण जोहर (Karan Johar) मॅचमेकर म्हणून प्रसिद्ध झाला आहे. इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही कलाकारचे ब्रेकअप होत असेल, तर त्यांच्यापेक्षा जास्त करणला काळजी असते आणि तो त्यांची समजूत काढून त्यांचे नाते तुटून देत नाही. कोणाचे लग्न होत असेल तर त्याची पूर्ण जाबबदारी तो आपल्या खांद्यावर घेतो. आजपर्यत कितीतरी जोडपे करणमुळेच एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच करणने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की,  इंडस्ट्रीमधील मॅचमेकींग करणे त्याचा अजेंडा आहे. त्याशिवाय निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि विद्या बालन (Vidya Balan) यांच्या जोडीमागे देखिल करणाचा मोठा वाटा आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या Tweak India या टॉक शोमध्ये ती करणला म्हणाली की, “तु सिने इंडस्ट्रीमधील ‘सीमा आंटी’ आहेस. तु मॅचमेकिंग करतोस जसे तुझे वडील करायचे. मी एकदा वहिदा रेहमान यांच्याशी बोल होते, तेव्हा त्यांनी मला सांगिकतले की, तुझ्या वडिलांनीच त्यांचे लग्न ठरवले होते. मला वाटत हे तुमच्या रक्तातच आहे की, तुम्ही दोन लोकांना एकत्र आणता.”

 

View this post on Instagram

 

ट्विंकलच्या वक्तव्यानंतर करणने स्व:ता सांगितले की, मी स्वत: जबाबदारी यासाठी स्विकारतो कारण हे करणं मला आवडतं. मी आधीच विचार पक्का करतो. मला आसं करुन आनंद मिळतो. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा अजेंडा आहे, जसं इतर अजेंडा राहिले आहेत. विद्याने एकदा मला फोन केला होता,तेव्हा मी तिची ओळख सिद्धार्थ रॉय कपूरशी करून दिली. दोघांचे बोलणे सुरु झाले आणि मला तेव्हा खूप बरं वाटलं होतं. कुठल्या सिनेमाच्या फीडबॅकवर इतकं बोललं जात नाही,जेवढ्या गप्पा या दोघांमध्ये तेव्हा झाल्या होत्या.”

पहायला गेलं तर करण चांगलेच काम केले आहे मात्र, सोशल मीडियावर त्याला मॅचमेकर सीमा तापरी यांच्या नावावरुन चिडवत आहेत. करणला काही नेटकरी बॉलिवूडची ‘सीमा आंटी’ नावाने ट्रोल केलं जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: ‘पुष्पा’ची क्रेझ अजूनही कायम, भारतीयांचं सोडाच; थेट कोरियन मुलीनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका
लंडनमध्ये करीनाला पोलिसांनी केली अटक? वाचा काय आहे ‘त्या’ फोटोंमागील सत्य

हे देखील वाचा