Tuesday, May 28, 2024

लंडनमध्ये करीनाला पोलिसांनी केली अटक? वाचा काय आहे ‘त्या’ फोटोंमागील सत्य

बॉलिवूडमध्ये ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान होय. पतौडी कुटुंबाची सूनबाई बनलेली करीना नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी तिचे चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे. मागील काही दिवसांपासून करीना कपूर लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये करीना तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगसोबतच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

शूटिंग सेटवरून शेअर केले फोटो
अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडन येथे पोहोचली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. हे फोटो शेअर करत करीनाने लिहिले आहे की, “डोवर डायरीज, युनायटेड किंगडम 2022. नेहमीच सेटवर असणारा खास मूड.”

करीनाने या पोस्टमध्ये 5 वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. काही फोटोत ती हसताना दिसत आहे, तर एका फोटोत ती परदेशी पोलिसांसोबत दिसत आहे.

‘करीनाला पोलिसांनी अटक केली’
करीनाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या सिनेमाच्या स्टोरीवरून एका चाहत्याने कमेंट केली की, “करीनाला पोलिसांनी अटक केली आहे.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “करीना एक गुप्तहेर आहे आणि तिला पोलिसांचा पाठिंबा आहे.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, “मागील 20 वर्षांपासून तू माझी पहिली आणि शेवटची आवडती अभिनेत्री आहेस.” एकाने असेही लिहिले की, “जगातील सर्वात चांगले स्मितहास्य.” दुसरीकडे, अभिनेत्री आलिया भट्ट हिने कमेंट करत लिहिले की, “हे लूक्स खूप आवडत आहेत.” तसेच, एकता कपूर हिने लिहिले की, “फॅब दिसत आहेस.”

करीना सिनेमात करणार गुप्तहेराचे काम?
माध्यमांतील वृत्तांनुसार, करीनाचा हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री आहे. यामध्ये ती गुप्तहेराचे काम करताना दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करणाऱ्यांमध्ये एकता कपूरसोबत करीनाचाही समावेश आहे. नुकतेच करीना आमिर खान (Aamir Khan) याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमातही दिसली होती. (Actress kareena kapoor khan shares pictures on instagram read what fans commented)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतसृष्टीवर शोककळा! मुलीला सासरी पाठवताच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचे निधन

‘बिग बाॅस 16’मध्ये घरातल्या सदस्यांवर कुरघोडी करतेय ‘ही’ स्पर्धक

हे देखील वाचा