Thursday, April 18, 2024

कंगनानंतर करण जोहर उतरला अंकिताच्या समर्थनार्थ, विकीची घेतली चांगलीच शाळा

सलमान खानचा(salman khan) रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ अंतिम फिनालेकडे वाटचाल करतोय, परंतू शोमधील गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीए. सध्या मुनावर फारुकी(munawar Faruqui) आणि आएशा खान(Ayesha khan) यांच्यातली भांडणं आणि अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात वाढणारं अंतर हे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेत. ‘बिग बॉस 17’ चा हा आठवडा घरातील स्पर्धकांच्या कुटुंबीयांच्या नावावर होता. जेव्हापासून अंकिताची सासू ‘फॅमिली वीक’मध्ये आली होती, तेव्हापासून लोक तिच्याबद्दलच बोलत आहेत. त्या एपिसोडनंतर फक्त प्रेक्षकच नाही तर बॉलीवूडमधले अनेक मोठे स्टार्सही अंकिता लोखंडेचे समर्थन करताना दिसतायत. याच क्रमात आता ‘बिग बॉस 17’च्या नवीन प्रोमोमध्ये करण जोहरही अंकिताचे समर्थन करताना दिसणार आहे.

करणने विकीला घेतलं रिंगणात
आगामी ‘वीकेंड का वार’ च्या प्रमोशनमध्ये, दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर शोमध्ये दिसणार आहे, जिथे तो अंकिता लोखंडेचा पती विकी जैन(Vicky Jain) याला त्याच्या आईच्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारणार आहे. प्रोमोमध्ये करण म्हणतो, ‘विकी, नवरा म्हणून तू अंकिताच्या(Ankita Lokhande) मागे उभं राहायला हवंस. तू तुझ्या आईविरुद्ध बोलायला पाहिजेस असं मी म्हणत नाही. मी फक्त इतकंच म्हणतोय की तू जाऊन तुझ्या बायकोला, अंकिताला विचारायला हवं होतंस की काय झालंय?

विक्की काय म्हणाला
करण जोहरचे(Karan Johar) प्रश्न ऐकून विकी जैन प्रोमोमध्ये खुप नाराज दिसला. शोच्या पुढच्या भागात, विकी अंकिताला बसवतो आणि तिला विचारतो, ‘काय झालं होतं ?’ या प्रश्नावर अंकिता बोलते ‘तुझी आई आली तेव्हा तिने सांगितले की, चप्पलवरून झालेल्या भांडणानंतर तुझ्या वडिलांनी माझ्या आईला फोन लावला होता.’ यावर विकी म्हणतो, ‘तुझे वडील असते तर त्यांनी काय केलं असतं?’ यावर अंकिता गप्प बसते.

शोमधलं अंकिता आणि विकीचे नातं
‘बिग बॉस 17′(Big Boss 17) सुरू झाल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं नातं चर्चेत आहे. लोकांना त्यांची प्रेमाळ भांंडणं आवडत आहेत , पण सध्या दोघांमधले गैरसमज खूप वाढले आहेत. विक्की जैनची आई मीडियामध्ये अंकिता लोखंडेविरोधात खुप काही बोलताना दिसतेय आणि या सर्व गोष्टींमुळे अंकिता आणि विकीमध्ये काहीच ठीक चालत नाहीए, असं लोकांना वाटतय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी जर तुमच्याबरोबर…’ श्रुती मराठेने केला मराठी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर
‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर रिलीझ, ‘हा’ अभिनेता साकारतोय शिवाजी महाराजांची भूमिका

हे देखील वाचा