Thursday, April 18, 2024

सनी देओलच्या ‘सफर’ चित्रपटात दिसणार सलमान खानची झलक, करणार कॅमिओ रोल

‘गदर २’ मधून बाॅलीवूडमधे धमाकेदार कमबाॅक करणारा आभिनेता सनी देओल त्याच्या आगामी चित्रपटामुळे पुन्हा चर्चाेत आहे. मागच्या काही दिवसांपासुन सनी ‘सफर’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान चित्रपटामध्ये ‘सलमान खान’ची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘सफर’ मध्ये झळकणार सलमान
सनी देओलने (Sunny deol) गदर २ (Gadar 2) मधून धमाकेदार कमबॅक केल्यानंतर आता फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘सफर’ (Safar) या त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे त्याचे फॅन्स खुश आहेतच पण, आता सलमान खानच्या फॅन्सससाठी सुद्धा ‘सफर’च्या सेटवरुन आनंदाची बातमी समोर येते आहे.

सनीच्या चित्रपटासोबत सलमान खानचे सुद्धा नाव जोडले जात आहे. या चित्रपटामध्ये सलमान सुद्धा असल्याचे समजते आहे. सलमान खान (Salman Khan) इंडस्ट्रीमधल्या प्रसिद्ध अभिनेत्यांपेेकी आहे. एवढेच नाही तर अनेक कलाकारांशी सलमानचे चांगले संबंध आहे. अनेक कलाकार त्याचे चांगले मित्र आहेत. त्यातीलच एक म्हणजे सनी देओल.

सफरमध्ये सलमानचा केमिओ
याच दरम्यान सलमान खान ‘सफर’ केमिओ करतांना दिसु शकतो. १२ आणि १३ जानेवारी दरम्यान मुंबईच्या महबुब स्टुडिओमध्ये शुटींग होणार आहे.

सलमानने या चित्रपटांत केला केमिओ
याआधी सलमान खानने शाहरुख खान, अजय देवगन, रणबीर कपूर, वरुण धवण, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांत याआधी केमिओ केला आहे.

सनी देओलचे आगामी चित्रपट
‘गदर २’च्या अफाट यशानंतर सनी देओल येत्या वर्षात अनेक चित्रपटात झळकणार आहे. लाहोेर १९४७, बाप आणि सफर याबरोबरच डायरेक्टर नितीश तिवारीचा बहुचर्चीत चित्रपट ‘रामायण’मध्ये सुद्धा आभिनेता सनी देओल हनुमानाच्या भुमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची डिलिव्हरी ‘भाऊचा नादखुळा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
‘तू गेल्यावर वाटलं स्वतःला मारून टाकावं’ अवधूत गुप्तेने कोणासाठी केली भावनिक पोस्ट? सोशल मीडियावर उडाली खळबळ

हे देखील वाचा