दुःखद! दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या मोठ्या भावाचे निधन; चित्रपटसृष्टीत पसरली शोकाची लाट

चित्रपट निर्माता आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) मोठा भाऊ रमेश बाबू गरू यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रमेश बाबू हे सुपरस्टार कृष्णाचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील लोकांना मोठा धक्का बसला आहे. रमेश बाबू यांच्या निधनाबद्दल पीण कल्याणसह अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

दुःखद बाब म्हणजे, महेश बाबू कोरोना पॉझिटिव्ह असताना रमेश बाबूचा मृत्यू झाला आहे. नुकतेच महेश बाबूने स्वतः ट्वीट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. (mahesh babu elder brother ramesh babu ghattamaneni passes away)

रमेश बाबू गरू यांच्या निधनाच्या वृत्ताला दिग्दर्शक रमेश वर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. रमेश वर्मा यांनी ट्वीट केले की, “ऐकून धक्का बसला, रमेश बाबू गरू राहिले नाहीत. कृष्णा गरू, महेश बाबू गरू आणि संपूर्ण कुटुंबाला शोक. ओम शांती.”

महेश बाबूप्रमाणेच त्याचा भाऊही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होता. त्यांनी १९७४ मध्ये ‘अल्लुरी सीतारामराजू’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटानंतर रमेश बाबूने ‘ना इले ना स्वर्गम’, ‘अण्णा चेलेलू’, ‘चिन्नी कृष्णदू’ यासारख्या हिट चित्रपटांसह अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. रमेश बाबूने लहान भाऊ महेश बाबूसोबतही अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

Latest Post