Monday, March 4, 2024

रविनाने सांगितले ‘कुछ कुछ होता है’ रिजेक्ट केल्यावर काय होती करण जोहरची प्रतिक्रिया?

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’मुळे(Karma calling ) चर्चेत आहे. अभिनेत्रीची ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी रवीना तिच्या वेब सीरिजचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. या दरम्यान, ती अनेक मुलाखती देत आहे ज्यामध्ये ती अनेक मजेदार खुलासे करत आहे. रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे की, तिने करण जोहरचा पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ (kuch kuch hota hai)नाकारला होता. करणच्या या चित्रपटात शाहरुख खान( shah raukh khan), काजोलसोबत राणी मुखर्जीही( rani mukerji) मुख्य भूमिकेत होती. पण राणीच्या आधी करणने रवीनाला ही भूमिका ऑफर केली होती. मात्र अभिनेत्रीने ते करण्यास नकार दिला होता.

रविनाने सांगितले ‘कुछ कुछ होता है’ रिजेक्ट केल्यावर काय होती करण जोहरची प्रतिक्रिया?

आता अलीकडेच रवीनाने ही भूमिका नाकारल्यावर करण जोहरची (karan johar) प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की – “आजही करण मला ती भूमिका नाकारल्याबद्दल जाब विचारतो. मी त्याला बोलते की यार, तू मला आणखी काहीही करायला लाव. एवढेच नाही तर धर्मा प्रॉडक्शनचा आणखी एक चित्रपट होता जो मी आणि वरुण सूद एकत्र करणार होतो पण दुर्दैवाने तो होऊ शकला नाही. असंही ती म्हणाली.

‘या’मुळे रवीनाने नाकारली होती भुमिका
रविनाने (Raveena tandon) मागच्या वर्षी एका इंटरव्युमध्ये ‘कुछ कुछ होता है’मधील भूमिका नाकारण्याचं कारण सांगितलं होतं. त्यावेळी ती म्हणाली होती की, ‘कुछ कुछ होता है’ नाकारल्यामुळे करणने मला अजुनही माफ केले नाही.परंतु मला त्यावेळी कळत नव्हते, कारण त्यावेळी काजोल आणि मी स्पर्धक होतो. जरी त्या चित्रपटात आम्ही दोघीही मुख्य भुमिकेत होतो. पण तसं असलं तरी माझं पात्र काजोलपेक्षा(kajol) छोटं आणि कमी महत्त्वाचं होतं. त्यामुळे मला तो रोल करायचा नव्हता.
या इंटरव्यूमध्ये तिने याचादेखील खुलासा केला होता की, पाॅप्युलर वेबसिरीज ‘आर्या’ला(arya) सुद्धा रवीनाने रिजेक्ट केले होते. त्यानंतर ती भुमिका सुष्मिता सेनने (sushmita sen) पार पाडली.

यादिवशी प्रदर्शित होणार ‘कर्मा काॅलिंग’
अभिनेत्री रवीना टंडनच्या आगामी वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’बद्दल सांगायचं तर, या सिरीजचा ट्रेलर रिलिज झाला आहे. प्रेक्षकांकडुन या ट्रेलरला भरगोस प्रतिसाददेखील मिळतोय. चाहते ‘कर्मा काॅलिंग’ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. ही सिरीज येत्या 26 तारखेला,’डिज्नी हाॅटस्टार’वर रिलीज होणार आहे

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुष्मिता सेनसोबतच्या अफेअरबद्दल विक्रम भट्ट यांनी तोडले मौन; म्हणाले, ‘मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही’
‘सुशांतच्या बहिणी आजही अंकिताला फोन करतात’, अंकिताच्या आईने केला धक्कादायक खुलासा

 

हे देखील वाचा