×

अभिनेता करण कुंद्राने मुंबईत खरेदी केले कोट्यवधी किंमतीचे आलिशान घर, किंमत व्हाल हैराण

बिग बॉसनंतर टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्राच्या फॅन फॉलोविंगमध्ये खूपच वाढ झाली आहे. या शोनंतर करणच्या हातात अनेक मोठे शो आहेत. नुकताच तो कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये जेलरच्या रूपात दिसला होता. या भूमिकेत सर्वानीच त्याला खूप पसंत केले. लॉकअपच्या अंतिम भागात तो त्याची गर्लफ्रेंड असलेल्या तेजस्वी प्रकाशसोबत दिसला होता. या दोघांची भेट बिग बॉसमध्ये झाली. शोदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये आता करणने एक नवीन घर खरेदी केले आहे. त्याने खरेदी केलेल्या घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

मीडियामधील माहितीनुसार करणने मुंबईच्या वांद्रे भागात आलिशान फ्लॅट घेतला असून, त्याचे रजिस्ट्रेशन देखील केले आहे. त्याचे हे नवीन घर सी फेसिंग असून या घरात एक लिफ्ट आणि स्विमिंग पूल देखील आहे. या घरची किंमत तब्बल २० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. करण जाहिराती, टीव्ही मालिका, चित्रपट आणि रियॅलिटी शोमधून बक्कळ कमाई करतो. त्याची ऐकून संपत्ती ४० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये करण कुंद्राने त्याच्या रोडीजपासून आणि लॉकअपच्या जेलरपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितले की, “मला वाटते की, हा प्रवास एक परीक्षकपासून स्पर्धक आणि पुन्हा जेलरपर्यंतचा एक ट्रॅजिशन प्रवास होता. मला नाही वाटत की, पुन्हा स्पर्धक बनू इच्छितो. मला आनंद आहे की, या शोसाठी मी पडद्यामागे होतो. जेव्हा मी स्पर्धक होतो तेव्हा मला माहित नव्हते की, पडद्यामागे काम करणारे लोकं किती मेहनत करतात. एक भाग चित्रित करून टेलिकास्ट करणे मोठी यात्राच आहे. मला आता पडद्यामागेच काम करायचे आहे.” करणला टेलिव्हिजन मालिका असणाऱ्या ‘कितनी मोहब्बत है’मधून तुफान लोकप्रियता मिळाली होती.\

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post