जरा इकडे पाहा! अंकित तिवारीच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धू-धू धुतलं, पाहा व्हायरल व्हिडिओ

0
46
ankit-tiwari

साेशल मीडियाेवर दरराेज काहीना काही व्हिडिओ येत असतात, जे पाहूण काेणालाही आश्चर्य वाटेल. नुकताच असाच एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे, ज्यामध्ये काही अंगरक्षक एका व्यक्तीला ढकलून देत आहेत. व्हिडिओ सुरुवातीला पाहून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण हा व्यक्ती एका गायकाचा जबरा फॅन आहे, जाे गायकाला भेटण्याचा आग्रह करत होता. मात्र, गायकाची सुरक्षा पाहणारेच त्या व्यक्तीसोबत गैरवर्तन करताता.  हा गायक दुसरा काेणी नसुन अंकित तिवारी आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका व्यक्तीला ओढताना दिसत आहेत. पण तरीही ती व्यक्ती आत जाण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि तेवढ्यात अंकित तिवारी (ankit tiwari) तिथे येतो आणि ताे सुरक्षारक्षकाला त्या व्यक्तीला सोडण्यास सांगताे. सिक्युरिटीने त्या व्यक्तीला सोडताच तो व्यक्ति भावूक हाेताे आणि अंकितचे पाया पडू लागताे. हा व्हिडिओ पाहून लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अंकित तिवारी हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी गायकांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीत एका पेक्षा जास्त  गाणी गायली आहेत. अंकित तिवारीने ‘आशिकी 2’, ‘तेरी गल्लियाँ’, ‘सुन रहा है ना तू’ सारखी गाणी गायली. या गाण्यांमुळे अंकितने लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. पण एका आरोपानंतर त्याच्या गाण्यावर बंदी घातली.

अंकित तिवारीच्या मैत्रिणीने गायकावर 9 मे 2014 रोजी बलात्काराचा आरोप केला हाेता, ज्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याच्या भावावर आराेप करण्यात आला की, ताे जीवे मारण्याची धमकी देत आहे. पण 2017 मध्ये दोघांचीही आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. 2018 मध्ये, अंकित तिवारीने कानपूरमधील हिंदू रितीरिवाजांनुसार पल्लवी शुक्लाशी लग्न केले, जिच्यासोबत ताे स्टार प्लसच्या हिट शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार

‘अनुपमा’ उतरत्या वयात हाेणार आई? पाहा भन्नाट व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here