Friday, January 31, 2025
Home अन्य ‘…तर आत्महत्या केली असती’ आयुष्यातील कटू सत्य सांगत ‘या’ अभिनेत्याने केला एक धक्कादायक खुलासा

‘…तर आत्महत्या केली असती’ आयुष्यातील कटू सत्य सांगत ‘या’ अभिनेत्याने केला एक धक्कादायक खुलासा

सध्या मनोरंजन क्षेत्रात कंगणा रणौतच्या (Kangana Ranaut)  लॉकअप कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कार्यक्रमात अनेक अतरंगी कलाकार आल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीणच वाढली आहे. कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ ला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शोमध्ये आलेले सर्व वादग्रस्त सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्याशी संबंधित मोठे खुलासे करत आहेत. आता करणवीर बोहराने (Karanvir Bohra) शोमध्ये त्याचे एक गंभीर रहस्य उघड केले आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो कोणत्या कठीण परिस्थितीतून जात आहे हे घरातील कैद्यांना सांगितले आहे. सध्या करणच्या या खुलाश्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, कंगणा रणौतच्या लॉकअप कार्यक्रमात सध्या करणवीर बोहरा चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात तो त्याच्या आयुष्यासंबंधीत अनेक गंभीर खुलासे करताना दिसत आहे. त्याच्या या गंभीर वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. कारागृहातील कैद्यांशी त्याच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलताना करणवीर बोहराने सांगितले की, गेल्या 7 वर्षांच्या कारकिर्दीत तो काही चांगले करू शकला नाही. यावेळी कार्यक्रमातील त्याच्या सहकलाकारांना म्हणजे सारा खान, साईशा आणि गीता फोगटला तो सांगतो की त्याच्या आयुष्यात त्याच्यावर अनेक कर्जे आहेत. लोकांचे पैसे परत न केल्यामुळे त्याच्यावर 3-4 खटलेही सुरू आहेत.

पुढे बोलताना करणवीर बोहरा म्हणाला की, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कर्जात आहे. पैसे परत न केल्याबद्दल माझ्यावर किमान 3-4 खटले सुरू आहेत. सन 2015 पासून आतापर्यंत मी जे काही काम केले ते पैसे परत करणे किंवा कर्ज फेडणे एवढेच आहे. केले आहे. मला स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप वाईट वाटत आहे. शेवटी मी त्यांना काय देणार? माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्याने आतापर्यंत आत्महत्या केली असती. माझ्यासाठी हा शो लाइफलाइन आहे.”

दरम्यान या कार्यक्रमात करणवीर चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच जेव्हा कंगना रणौतने ब्लू आणि ऑरेंज टीमची अदलाबदल केली तेव्हा करणवीरचे निशा रावलशी भांडण झाले होते. निशाने करणवीरवर तिला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आणि भविष्यात चुकूनही असे न करण्याचा इशारा दिला. यानंतर करणवीरने निशाची माफीही मागितली, आता करणवीर शोमध्ये किती पुढे जातो. येणारा काळच सांगेल, पण सध्या तो एकामागून एक खुलासा करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा