Friday, March 29, 2024

टेलिव्हिजनवर लग्न केलेल्या ‘या’ अभिनेत्याने सांगितले लग्न करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

सध्या मनोरंजन क्षेत्रात कंगना राणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रम सतत चर्चेत आहे. या शोमध्ये कैदी म्हणून अनेक अडकलेल्या सेलिब्रिटींना दाखवण्यात आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये दररोज होणारे नवनवीन खुलासे प्रेक्षकांना आकर्षित करत असून, प्रेक्षकांसाठी निर्माते या शोमध्ये दररोज काही ना काही प्रयोग घेऊन येत आहेत. दरम्यान, आता अली मर्चंटला या शोमध्ये 14वा स्पर्धक म्हणून एंट्री देण्यात आली आहे. याआधी अली बिग बॉस 4 च्या दरम्यान चर्चेत आला होता. यामध्ये तो सारा अलीच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर नॅशनल टीव्हीवर दोघांनी लग्न देखील केले होते. या लग्नाची त्याकाळात जोरदार चर्चा झाली होती. आता अलीने पत्नी सारा बद्दल अनेक खुलासे लॉकअपमध्ये केले आहेत.

सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर कंगना रणौतच्या लॉकअप कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली आहे. कार्यक्रमात सहभागी कलाकार रोज नवनवीन खुलासे करताना दिसत आहेत. आता या कार्यक्रमात अली मर्चंटला वाइल्ड कार्ड एंट्री दिल्याने प्रेक्षकांना सारा खान आणि अलीची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रवेश मिळाल्याने अलीने आनंद व्यक्त केला आहे. शोबद्दल तो म्हणला की. ‘मी या कार्यक्रमात जात आहे याचा मला आनंद आहे. मला वाटते की मी खूप दिवसांपासून अशा कार्यक्रमाची वाट पाहत होतो.’

आपल्या सध्याच्या करिअरबद्दल बोलताना अलीने अनेक खुलासे केले आहेत. तो म्हणाला, ‘बिग बॉसनंतर मला फार कमी चांगली कामे मिळू लागली होती. माझ्याकडे व्यावहारिकदृष्ट्या कोणतेही काम नव्हते. म्हणून मी एका कारखान्यात काम करू लागलो, ज्यासाठी दररोज पाच तास प्रवास करावा लागायचा. नंतर मी म्युझिक व्हिडिओ करायला सुरुवात केली, आता मी यशस्वी काम करत आहे. प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेसाठी करण्यावर माझा विश्वास आहे. आणि शोमध्येही मी तेच करेन.”

दरम्यान लग्नानंतर अलीने पत्नीबाबत अनेकवेळा खळबळजनक खुलासे केले होते. अलीने सारावर अनेक गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीदरम्यान त्याने लग्न करणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. त्याच बरोबर सारा खानने लॉकअपमध्ये अलीबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. ज्याला अलीनेही उत्तर दिले होते, तसेच याआधी इच्छाही व्यक्त केली होती की, जर त्याला या शोची ऑफर मिळाली तर त्याला नक्कीच त्याचा भाग व्हायला आवडेल.

        दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा