Sunday, May 19, 2024

प्रतिभावान अभिनेता अशी ओळख असलेल्या अभय देओलने ‘या’ चित्रपटांमधून दाखवली दमदार अभिनयाची झलक

अभय देओल (Abhay Deol)  हा हिंदी चित्रपट जगतातील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभय देओलच्या कसदार अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकडे अभय देओल लक्ष देत असतो, त्यामुळेच त्याच्या अभिनयाची आणि चित्रपटांची चर्चा पाहायला मिळते. आज (१५ मार्च) अभय देओलचा वाढदिवस. जाणून घेऊ या त्याच्या काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल. 

बालपणापासूनच अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या अभय देओलचा जन्म १५ मार्च १९७५ ला झाला. अभय देओलचे वडील अजित देओल हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.त्यामुळे अभिनेता अभय देओलला अभिनयाची आवड घरातुनच निर्माण झाली होती. देओल कुटूंबातील इतर सदस्यांप्रमाणे अभय देओलनेही अभिनयक्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

अभयने २००५ मध्ये इम्तियाज अलीच्या सोचा ना था चित्रपटातून अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. अभय देओल जरी इतर अभिनेत्यांसारखा मोठा गाजलेला कलाकार नसला तरी त्याला नेहमीच त्याच्या कामाची, अभिनयाची प्रेक्षक आणि समीक्षकांनी वाहवा केली. अभय फारसा चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी त्याचे सिनेमे नक्कीच लोकांसाठी काहीतरी नवे देऊन जाणारे असतात. मागील काही काळापासून अभय ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगलाच सक्रिय झाला आहे.

अभय नेहमीच देओल परिवाराच्या अगदी जवळचा समजला जातो. अभय सर्वात जास्त ईशा देओलच्या जवळ आहे. ईशाच्या लग्नात देखील अभयनेच भावाची सर्व कर्तव्य पार पाडली आहे. आज अभयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या काही अतिशय गाजलेल्या चित्रपटांबद्दल. अभय देओल नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये अभय देओलचे ‘हे’ चित्रपट चांगलेच गाजले होते.

१. एक चालीस की लास्ट लोकल –

अभय देओलच्या नाविण्यपूर्ण चित्रपटांपैकी हा एक गाजलेला चित्रपट होता. यामध्ये त्याच्यासोबत नेहा धुपियाने काम केले होते. या रहस्यमय चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत पडद्याशी खिळवून ठेवले होते. या चित्रपटात त्याची चॉकलेट बॉयची भूमिका प्रेक्षकांना कुठेही पाहायला मिळाली नव्हती.

२.ओय लकी! लकी ओय-

अभय देओलच्या करिअरसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता.हा चित्रपट देविंगर सिंग  नावाच्या एका चतुर चोरावर आधारित होती. या चित्रपटाला राष्ट्रिय पुरस्कारही मिळाला होता.

३. देव डी –

हा चित्रपट देवदास या गाजलेल्या चित्रपटाचे मॉडर्न वर्जन होते. या चित्रपटातील अभय सिंगच्या भूमिकेचे कौतुक झाले होत्या. या चित्रपटात अभयने प्रेमभंग झाल्यानंतर नशेच्या आहारी गेलेल्या मुलाची व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रपटात त्याच्यासोबत माही गिल आणि कल्की कोचलिन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

        दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

तर ‘या’ कारणामुळे जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख राहिल्या अजूनही अविवाहित, स्वतःच केला खुलासा

‘तोंड लपवण्याची वेळ यावी असे काम का करावे’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ‘या’ अभिनेत्रींच्या नवऱ्याला ट्रोल

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करताना कंगनाने पुन्हा साधला आलिया भट्टवर निशाणा

हे देखील वाचा