‘कोणते नाव निवडशील, कपूर की खान?’, लग्नानंतर करीनाला पत्रकाराचा प्रश्न; ‘बेबो’नेही दिले होते भन्नाट उत्तर


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्या त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील तितक्याच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीतील अशीच एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. करीना नेहमी अनेक गोष्टींवर तिचे मत अगदी बिनधास्तपणे मांडते. असे असताना देखील ती काही गोष्टींवर मत मांडण्यापासून वाचत देखील असते. करीनाचे बोलणे, तिचे शब्द अनेकदा हेडलाईन देखील बनतात. बॉलिवूडची बेबो नेहमी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते.

करीना ही पतौडी घराण्याची सून असण्यासोबतच चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अशा कपूर घराण्याची मुलगी देखील आहे. अभिनयाचा वारसा मिळालेल्या करीनाने चित्रपटांमध्ये उत्तम काम करत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१२ साली करीनाने बॉलिवूडचा नवाब असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केले. जेव्हा करीनाने हे लग्न केले त्यानंतर तिच्यावर खूप टीका झाली. अनेकदा तिला ट्रोल देखील केले गेले. यातच मुलाखतीदरम्यान पत्रकारांनी करीनाला तिच्या नावावरून प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नांचे तिने उत्तर दिल्यानंतर सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या.

नुकताच करीनाचाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक पत्रकार तिला विचारतो की, “तू कोणते नाव निवडशील कपूर की खान?” याला उत्तर देताना करीनाचा हजरजबाबीपणा सर्वानीच अनुभवला. हा प्रश्न विचारल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता करीना म्हणाली, “समस्या ही आहे ना की, मी कोणा एकाला नाही निवडू शकत. कारण मी करीना कपूर खान आहे. या गोष्टीसाठी मी खूप भाग्यशाली आहे.” करीनाचे हे उत्तर ऐकून सर्वानी एकच जल्लोष केला आणि तिच्या या उत्तरासाठी टाळ्या वाजवल्या.

करीनाच्या हजरजबाबीपणाचे हे एकच उदाहरण नाही, तर अशी अनेक उदाहरणं आहेत. एका मुलाखतीदरम्यान करीनाला विचारले होते की, “जर तू कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्यासोबत लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करशील?” या प्रश्नाचे उत्तर देताना करीना म्हणाली, “मी एका गोष्टीची काळजी घेईल की, त्या लिफ्टमध्ये रणबीर कपूर नसेल.”

एका शो दरम्यान करिनाने कॅटरिना कैफला वहिनी म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.