Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड सवत माझी लाडकी! ‘असे’ आहे करीना कपूर आणि अमृता सिंगमधील नाते, करीनाने केला खुलासा

सवत माझी लाडकी! ‘असे’ आहे करीना कपूर आणि अमृता सिंगमधील नाते, करीनाने केला खुलासा

बॉलिवूड जगतात घटस्फोट, प्रेम, ब्रेकअप या गोष्टी अगदी अतीसामान्यच समजल्या जातात. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत दुसरे लग्न केले आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सैफ अली खानचे (Saif Ali Khan) पहिले लग्न अमृता
सिंगसोबत (Amrita Singh)  झाले होते. अमृता सिंग आणि सैफ अली खानला इब्राहिम आणि सारा अली खान (Sara Ali Khan) अशी दोन मुलेही होती. मात्र काही वर्षानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. या घटस्फोटानंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत (Kareena Kapoor)  लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, करीना कपूरने एका मुलाखतीत बोलताना तिच्या आणि अमृता सिंगच्या नात्याबद्दलचा मोठा खुलासा केला होता. 

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर हे इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. करीना आणि सैफने  2012 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. याआधी सैफ अली खानला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. घटस्फोट होऊनही सैफ अली खान सारा आणि इब्राहिमला आजही अनेकदा भेटताना दिसतो. तसेच सारा अली खाननेही करीना कपूर माझी चांगली मैत्रिण असल्याचे सांगितले होते.

मात्र करीना कपूर आणि अम्रिता सिंगचे नाते कधीही उघडपणे समोर आले नाही. याबाबतचा करीना कपूरने एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला होता. यावेळी ती म्हणाली होती की, “मी आजपर्यंत कधीही अमृता
भेटलेले नाही मात्र मी तिचा खूप आदर करते.” तसेच अमृता आणि सैफच्या घटस्फोटासाठी करीना जबाबदार आहे असेही बोलले जात होते यावरही करीनाने “मी त्यांच्या घटस्फोटानंतर खूप वर्षांनी सैफला भेटले” असा खुलासा केला होता. आता सैफ आणि करीनाला तैमुर आणि जहांगिर अशी दोन मुले आहेत. अलिकडेच आलिया आणि रणबीरच्या लग्नात सैफ अली खान आणि करीना कपूर एकत्र झळकले होते. त्यावेळी त्यांच्या दमदार लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. (kareena kapoor aboout her relation with amrita singh)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी यांचा हाेणारा जावई आहे तरी कोण? जाणून घ्या…

सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा

हे देखील वाचा