सैफीनाने ठरवले त्यांच्या मुलाचे नाव; आता ‘या’ नावाने ओळखला जाणार तैमुरचा छोटा भाऊ


बॉलिवूडमधील सुपरहिट जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे या वर्षी दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी अजून त्यांच्या छोट्या मुलाचे नाव जाहीर केले नव्हते. पण आता अशी माहिती समोर आली आहे की, सैफ आणि करीनाने त्यांच्या मुलाचे नाव ठरवले आहे. (Kareena Kapoor Khan and saif ali khan decided their little son name)

माध्यमातील वृत्तानुसार सैफ अली खान त्याच्या वडिलांचे नाव त्याच्या छोट्या मुलाला देऊ इच्छितो. त्याच्या वडिलांचे नाव मंसूर अली खान पतौडी हे आहे. त्यामुळे त्याला त्याच्या मुलाचे नाव मंसूर ठेवायचे आहे. परंतु या नावाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

करीना आणि सैफने ही गोष्ट आधीच सांगितली होती की, ते त्यांच्या छोट्या मुलाला सोशल मीडियापासून आणि लाइमलाईटपासून दूर ठेवणार आहेत. तैमूर ज्याप्रमाणे लाइम लाईटमध्ये होता, त्याप्रमाणे त्यांचा छोटा मुलगा असावा असे त्यांना अजिबात वाटत नाही.

सैफ अली खान आणि करीना कपूरने २०१२ साली लग्न केले होते. हे सैफचे दुसरे लग्न आहे. २०१६ मध्ये करीनाने तैमूरला जन्म दिला. २० डिसेंबर २०१६ ला तैमूरचा जन्म झाला होता. त्यांनी मागच्या वर्षी घोषणा केली होती की, ते दुसऱ्या वेळेस आई बाबा बनणार आहेत.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघेही कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. करीना कपूर ही ‘लाल सिंग चड्डा’ या तिच्या आगामी चित्रपटात आमिर खानसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.