‘जागतिक योगा दिना’निमित्त करीनाने केला विना मेकअप फोटो शेअर; ‘व्वा आजीबाई व्वा’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल


बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. अनेकजण योगा करत असतात. सोमवारी (21 जून) जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने देखील तिचा एक योगा करताना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिने हा फोटो विना मेकअपचा शेअर केला आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. ( Kareena Kapoor Khan get troll after sharing her yoga photo on social media)

करीना कपूरने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “मी 2006 पासून योगा सुरू केला आहे. जेव्हा मी ‘टशन’ आणि ‘जब वी मेट’ हे चित्रपट साईन केले होते. योगाने मला एक वेगळीच शक्ती प्रदान केली आहे. ज्यामुळे मी आज एवढी फिट आहे. आता दोन मुलं झाल्यानंतर मी खूपच थकले आहे. त्यामुळे मी पुनः योगाकडे वाटचाल सुरू करत आहे. योगा करताना केवळ माझा वेळ असतो. योगा करत राहा.”

तिच्या फोटोवर अनेक विचित्र कमेंट येत आहेत. तिच्या या फोटोमध्ये ती अशी दिसत आहे, जसे काय तिने कोणती नशा केली आहे. लोकांना तिचा हा फोटो पाहून म्हटले आहे की, ‘ती म्हातारी दिसत आहे.’ एका युजरने या फोटोवर कमेंट करून लिहिले आहे की, “व्वा आजीबाई व्वा.” अशाप्रकारे नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत.

या आधी तिने सैफ अली खान आणि तैमूरचा योगा करतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते दोघेही खूपच क्यूट दिसत होते.

तिने सांगितले की, ती स्वतःला फिट करण्यासाठी तीने पुन्हा एकदा योगा चालू केला आहे. त्यामुळे काही महिन्यात तिच्या चेहऱ्यावर पुनः तेज झळकणार आहे. करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.