Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड अवॉर्ड सोहळ्यात शाहिदचा झाला ‘मोए मोए’, करिनाने केले…

अवॉर्ड सोहळ्यात शाहिदचा झाला ‘मोए मोए’, करिनाने केले…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा नुकतांच पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता शाहिद कपूरची (Shahid kapoor). रेड कार्पेटवर शाहिदची चांगलीच फजिती झाली. विशेष म्हणजे यामागे त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

हा सोहळ्याला अभिनेता शाहरुख खान, रानी मुखर्जी, आदित्य कपूर, अॅटली, करीना कपूर तसेच शाहिद कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील रेड कार्पेटवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामधील शाहिदचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?
व्हायरलं होणाऱ्या व्हिडीओमध्ये करीन कपूर आणि शाहिद कपूर दिसत आहे. सोहळ्यादरम्यान शाहिद कपूर रेड कार्पेटवर पोज देताना दिसत आहे. पापाराझी त्याचे फोटो क्लिक करत असतानाच रेड कार्पेटवर करिनाची एन्ट्री होते. यावेळी करिना सर्व फोटोग्राफर्सना हाय हॅलो करते. पण शाहिदकडे पाहतदेखील नाही. त्याच्यासमोरुन थेट निघून जात ती पोज देताना दिसते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा भडीमार करत आहेत. तर काही युजर्सनी शाहिदचा ‘मोए मोए’ झाला व्हिडीओ शेअर केला आहे. तर ‘ हे दोघे एकत्र असते तर आत्ता ही जोडी बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखली गेली असती’ अशी एका युजरने कमेंट केली आहे.

शाहिद व करीनाच्या ब्रेकअपला १५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण इतक्या वर्षातही हे दोघे सार्वजनिकरित्या कधीच एकमेकांना भेटताना किंवा एकमेकांशी बोलताना दिसलेले नाहीत. त्यांनी ‘उडता पंजाब’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं, पण त्यांचे एकत्र सीन नव्हते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही ते एकमेकांशी अंतर राखून असायचे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रेडिओचा आवाज हरपला; निवेदक अमीन सयानी काळाच्या पडद्याआड
‘माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीतून अनेकांनी पैसे कमवले’, पोस्ट शेअर करत पूनम पांडेने केले गंभीर आरोप

हे देखील वाचा