‘मी चांगली आई नव्हते; मला तैमूरचे डायपरही घालता येत नसायचे’, करीनाचा आपल्या पुस्तकातून मोठा खुलासा


सध्या करीना कपूर खान तिच्या पुस्तकावरून चांगलीच चर्चेत आली आहे. ९ जुलैला करीनाचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. २०२१च्या सुरुवातीलाच करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जेहला जन्म दिला होता. या मुलाच्या जन्मानंतर करीनाने तिच्या दोन्ही प्रेग्नंन्सीच्या काळातील तिचे चांगले वाईट अनुभव या पुस्तकात लिहिले. हे पुस्तक प्रकाशित होत असल्याची बातमी देखील करीनाने सोशल मीडियावरून दिली होती.

करीनाने तिच्या या पुस्तकात तिचे अनेक अनुभव आणि काही खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, आई झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात ती अजिबात चांगली आई नव्हती.

तिने तिच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले की, “बाळाशी संबंधित जेवढ्या जवाबदाऱ्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मी खूपच कमी पडत होते. सुरुवातीला मी एक परिपूर्ण आणि चांगली आई नव्हते. मला सुरुवातीला तैमूरची शी- सू कशी साफ करावी किंवा त्याचे डायपर कसे काढायचे ते माहित नव्हते. बर्‍याच वेळा त्याची शी बाहेर यायची सू लीक व्हायची. कारण मी त्याला डायपर व्यवस्थित घालू शकत नव्हते. इथे मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते की, तुम्हाला जे योग्य आणि सोपे वाटेल ते करा. आई जेव्हा आत्मविश्वासू आणि कम्फर्टेबल होते, तेव्हा तुमचे बाळ देखील तसेच होते. हेच करणं आहे माझे माझ्या कामावर पुन्हा लवकर परतण्याचे.”

करीना तिच्या कामाबद्दल पुढे म्हणाली, “मला माहित होते की, फक्त एक आई होणे ही माझी ओळख नाही. म्हणूनच मी गरोदर असताना देखील काम करत होती आणि आता प्रसूतीनंतर देखील ती लवकरच पुन्हा कामावर परतली आहे.”

करीना कपूरचे हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तिने लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत समाजातील धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, एका ख्रिश्चन गटाने तिच्यासह दोन जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बीडमध्ये पोलिसांकडे ही तक्रार आली आहे.

करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे. सध्या आमिर लडाखमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.