बॉलिवूड अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूर ही बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कधी तिच्या चित्रपटामुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून ती तिचे पुस्तक ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल’मुळे खूप चर्चेत होती. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या दैनंदिन आयुष्याची झलक ती रोजच चाहत्यांना देत असते. ती तिच्या मुलांसोबत तसेच पती सैफ अली खानसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. अशातच करीनाने रविवारी (१ ऑगस्ट) तिची बहीण आणि बॉलिवूड अदाकारा करिश्मा कपूरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. करीना कपूरने शेअर केलेल्या या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना आणि करिश्मा मिळून खूप पदार्थ खाताना दिसत आहेत. डायनिंग टेबलवर बसलेल्या करीना आणि करिश्मा सुरुवातीला खूप खाताना दिसत आहेत, नंतर काही सेकंदानंतर त्या सोफ्यावर आरामात झोपून जातात.
करीनाने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “जेव्हा मी म्हणते लोलो(करिश्मा कपूर) आणि माझा हा शानदार विकेंड आहे, तेव्हा माझा अर्थ असा असतो.” तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिचे चाहते जोरदार प्रतिसाद देत आहेत. तिचे चाहते या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. तसेच व्हिडिओला पसंती दर्शवत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला करीना कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव जैद असे ठेवले आहे. परंतु अजूनही तिने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. कारण तिचा पहिला मुलगा तैमूर जेवढा चर्चेत आहे तेवढा तिचा दुसरा मुलगा येऊ नये, म्हणून तिने त्याला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने याआधी शेवटचे २०२० मध्ये आलेल्या ‘अंग्रेजी मिडीयम’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ती इरफान खानसोबत दिसली होती. ती आता आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग तिने प्रेग्नेंसीच्या दरम्यानचं पूर्ण केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक