Friday, March 29, 2024

सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अभिनेता बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड ऍंम्बेसेडर; रशियात करणार टीम इंडियाचे नेतृत्व

साल २०२० मध्ये कोरोनाने आपल्या आयुष्यात एन्ट्री केली. त्यानंतर गरीब आणि गरजू लोकांसाठी धावून आला एक देवदूत, ज्याने या लोकांना निस्वार्थपणे मदत केली, किंबहुना आजही करत आहे. असा अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनूने नुकताच त्याचा ४८वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याला सर्वांनीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला त्याच्या वाढदिवसाचे अतिशय हटके आणि अविस्मरणीय गिफ्ट देखील मिळाले आहे. सोनू सूदला त्याच्या वाढदिवसाला विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड ऍंम्बेसेडर बनवण्यात आले आहे.

Photo Courtesy: Instagram/Sonu Sood

एवढेच नाहीतर पुढच्या वर्षी रशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेचा सोनू भाग असणार आहे. एका मोठ्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, याची घोषणा नुकतीच सोनू सुदने भारताच्या खेळाडूंसोबतच आणि अधिकाऱ्यांसोबत एका चर्चेदरम्यान केली आहे. याबद्दल सोनूने सांगितले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे. मला या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासोबत या प्रवासात सामील होण्याची बहुमूल्य संधी मिळणार आहे. मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजत आहे. मंच अजून जास्त मोठा करण्याचे मी वचन देतो.

सोनुने सर्व खेळाडूंच्या खेळण्याची आणि त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची खूप स्तुती केली. सोबतच या सर्व खेळाडूंच्या प्रश्नांना उत्तरं देखील दिले. ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक प्रदेशाचा उपक्रम असलेल्या वॉक फॉर इन्क्लुजनसाठी खेळाडूंनी त्याची ओळख करून दिली. ऑलम्पिक भारत ब्रँड ऍंम्बेसेडरची भूमिका निभावणारा सोनू जानेवारीत रशियाच्या कजानमध्ये भारताच्या खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे.

यावर बोलताना सोनू म्हणाला, “मी या विशेष विश्व ऑलम्पिक खेळांच्या दरम्यान रशियामध्ये आपल्या टीमसोबत असण्याची संधी मिळाल्याने खूपच गौरवान्वित झालो आहे. मी आपल्या सर्व खेळाडूंना त्यांचे सर्वोत्कृष्ट योगदान देण्यासाठी प्रेरित करेल. त्यांना अशा पद्धतीने प्रेरित करेल की त्याचा आवाज भारतात ऐकू येईल. जे खेळ प्रत्येक दोन वर्षात आयोजित केले जातात, अशा बौद्धिक विकलांग लोकांसाठी सर्वात मोठ्या जागतिक खेळांचे आयोजन आहे.

Photo Courtesy: Instagram/sonu_sood/

तत्पूर्वी ऑलिम्पिकच्या पुढच्या शीतकालीन खेळांचे आयोजन २२ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान रशियामधील कजानमध्ये केले जाणार आहे. सोनुने कोरोनाच्या काळात लोकांना बेड मिळवण्यापासून ते ऑक्सिजन, औषधं, इंजेक्शन आणि या महामारी काळात लोकांना त्याचे काम गेल्याने नवीन कामसुद्धा दिले आहे. सोनूच्या या कार्यांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली. सोबतच अनेक लोकांनी त्याला भेटून त्याचे आभार देखील मानले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा