Thursday, March 28, 2024

बक्कळ रक्कमेच्या मोहात न पडता ‘या’ कलाकारांनी ‘बिग बॉस’साठी दिला स्पष्ट नकार; सलमानच्या अभिनेत्रीचाही आहे समावेश

‘बिग बॉस’ टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा आणि विवादित रियॅलिटी शो आहे. बिग बॉसचे १४ सीझन झाले आहेत आणि लवकरच या शोचा १५ वा सीझन धडाक्यात सुरु होणार आहे. बिग बॉस हा शो सुरु असला तरी चर्चेत असतो आणि बंद झाला तरी चर्चेत असतो. कमीतकमी ९० दिवस जगाशी असणारा सर्व संपर्क तोडून या घरात काही अनोळखी आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांसोबत राहणे वाटते तितके सोपे नाही. कलाकारांच्या या घरातील प्रवासात अनेक उतार-चढाव येतात काही कलाकार खूपच जिवलग मित्र इथे तयार करतात तर काही लोकं एकमेकांचे दुश्मन होतात. लहान मोठे शाब्दिक वाद आणि कधी कधी तर मारामारीपर्यंत देखील हे वाद गेलेले आपण पाहिले आहे.

हा शो जेवढा त्यातील पदांसाठी ओळखला जातो, तेवढाच अजून एका कारणांसाठी ओळखला जातो, आणि ते कारण म्हणजे कलाकरांना मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता. जे कलाकार प्रसिद्धीच्या किंवा लोकप्रियतेच्या बाबतीत मागे पडतात, त्याना पुन्हा लोकांच्या आठवणीत येण्यासाठी हा शो उत्तम संधी असते. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. याचा या कलाकारांना नक्कीच फायदा देखील झाला. यात श्वेता तिवारी, हिना खान, रवी किशन, काम्या पंजाबी, सिद्धार्थ शुक्ला आदी अनेक मोठी नावे आहेत. कलाकारांना या शोमध्ये सहभागी करून घेण्यासाठी निर्मात्यांकडून मोठ्या मोठ्या फी सुद्धा दिल्या जातात. मात्र असे असूनही अनेक कलाकार या शोसाठी नकार देखील देतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊया असे कलाकार, ज्यांनी या शोसाठी जास्त फी मिळूनही दिला आहे नकार. (these celebrity rejected big boss 15)

दिव्यांका त्रिपाठी
‘बनू मैं ‘तेरी दुल्हन’, ‘ये हैं मोहब्बतें’ आदी मोठ्या आणि सुपरहिट मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात मोठी, कायमस्वरूपी जागा निर्माण करणाऱ्या दिव्यांकाला देखील या शोसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र तिचा पती विवेक दहियाने या शोसाठी नकार दिला. आता दिव्यांका ‘खतरों के खिलाड़ी’ या शोमध्ये दिसत असून, विविध मोठे आणि अवघड स्टंट करत आहे.

भूमिका चावला
सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ सिनेमात काम करणारी अभिनेत्री भूमिका चावलाला देखील बिग बॉससाठी विचारणा करण्यात आल्याचे समजले आहे. मात्र तिने ती खूपच खासगी व्यक्ती असल्याचे सांगत नकार दिला आहे. भूमिकाने सलमानसोबत दमदार आणि यशस्वी पदार्पण केले, मात्र तिचे करियर पाहिजे तितके यश मिळवू शकले नाही.

माहिका शर्मा
टीव्ही अभिनेत्री माहिका शर्माला देखील या बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र तिला या विवादित शोपेक्षा टीव्हीवर अधिक चांगल्या मालिका आणि इतर शो करायचे आहे.

अदित्य नारायण
गायक, अभिनेता, सूत्रसंचालक अशा भूमिका अगदी लीलया पार पडणाऱ्या आदित्य नारायणाला देखील बिग बॉससाठी विचारणा झाली आहे. मात्र त्याने देखील या शोपेक्षा दुसऱ्या एखाद्या शोचा भाग बनण्यात अधिक रस असल्याचे सांगत नकार दिला.

अंकिता लोखंडे
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताला देखील बिग बॉस १५ साठी विचारले गेले होते. तिचे नाव फॅनला झाल्याचे देखील मीडियामध्ये सांगितले जात होते. पण अंकिताने या शोला नकार दिला.

लवकरच बिग बॉस १५ सुरु होणार आहे, त्यामुळे या पर्वात नक्की कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहे, हे लवकरच समजेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा