Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘आजपर्यंत त्यांना नाही भेटले’, तर ‘असे’ आहेत करीना कपूर आणि अमृता सिंगचे नातेसंबंध; बेबोने केला खुलासा

‘आजपर्यंत त्यांना नाही भेटले’, तर ‘असे’ आहेत करीना कपूर आणि अमृता सिंगचे नातेसंबंध; बेबोने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात दोन विवाह केले आहेत. सैफने पहिलं लग्न त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्री अमृता सिंगसोबत केलं होतं. सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये वयातील फरक विसरून एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. यामुळे २००४ मध्ये, तब्बल १३ वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

यानंतर सैफ अली खानच्या आयुष्यात करीना कपूर आली, जी अभिनेत्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. सध्या सैफ आणि करीना सुखाने संसार करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की सैफच्या दोन्ही बायका एकमेकांपासून मर्यादित अंतर ठेवणं पसंत करतात. एवढंच नाही, तर करीना कपूर अमृता सिंगला कधीच भेटली नाही. स्वतः करीनाने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. (kareena kapoor never met saif ali khan ex wife amrita singh know the reason)

करीना कपूर अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सीझन ६ मध्ये पोहोचली होती. या दरम्यान करीना आणि प्रियांकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली होती. यावेळी करण दोन्ही अभिनेत्रींना वैयक्तिक प्रश्न विचारताना दिसला. शोमध्ये करणने करीनाला अमृता सिंगबद्दल विचारलं. त्यानंतर करीनाने खुलासा केला की, ती कधीही अमृता सिंगला भेटली नाही. करीनाच्या या खुलास्याने करण जोहरला आश्चर्याचा धक्का बसला.

या शोमध्ये करणने करीनाला विचारलं की, “तू अमृतासोबतही संतुलन राखतेस?” तुम्ही दोघी एकमेकींशी बोलता का? यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “नाही, पण मी त्यांचा खूप आदर करते. आम्ही कधीच भेटलो नाहीत.” नंतर त्याने करीनाला विचारले, “तू कधीच भेटली नाहीस?’ या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली, “नाही, मी सैफला घटस्फोटानंतर खूप वर्षांनी भेटले होते. त्यावेळी तो स्पष्टपणे सिंगल होता.”

सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अमृता सिंगने अभिनेत्याशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन्ही मुलांसोबत ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. सारा अनेकदा सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये ती तिच्या आईसोबत मस्ती करताना दिसते. शिवाय, सारा तिची सावत्र आई करीना कपूरसोबत देखील चांगलं नातं जपते. त्या दोघी एकमेकींना मैत्रीण मानतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूर आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, ‘या’ फोटोमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

-पहिले लग्न १२ वर्ष मोठ्या अमृता सिंगशी, दुसरे लग्न नऊ वर्ष लहान करिनाशी; अशी आहे नवाब सैफच्या वैवाहिक जीवनाची स्टोरी

-प्रेमात ३ वेळा अपयशी, १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानसोबत अमृताने केले होते लग्न, आता सिंगल मदर बनून जगतेय आनंदी आयुष्य

हे देखील वाचा