करीना कपूर आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, ‘या’ फोटोमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर सध्या ट्रोल होत आहे. नेटकरी करीना कपूर खानला विचारत आहेत की, जेव्हा तुला कारमध्ये बसून कॉफी प्यावी लागते, मग एवढे मोठे घर कशाला आहे? करीना कपूर खान तिच्या घराबाहेर कॉफीचा मग घेऊन दिसली होती. थोडं फिरल्यावर ती कॉफी मग घेऊन तिच्या गाडीत बसली. तिचा हा व्हिडिओ बॉलिवूडपॅपने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. जिथे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानी लिहिले की, “घराच्या आत कॉफी पी ना.” त्याचवेळी, दुसर्‍या नेटकऱ्यानी लिहिले की, “ही घराच्या आतही अशीच फिरत असते का?”

करीनाला ट्रोल करण्याबरोबरच बरेच नेटकरी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि तिच्या लूक आणि सौंदर्याची कौतुक करत आहेत. करीना कॉफी मग घेऊन घराबाहेर पडताच पॅपराजींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरूवात केली. तिच्या हातात असलेल्या कॉफीच्या मगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. नेटकरी आश्चर्यचकित आहेत की, करीना कपूरचे इतके मोठे घर आहे, तर ती कारमध्ये कॉफी का पीत आहे. नेटकरी म्हणत आहेत की, करीनाला घरात कॉफी प्यायलाही वेळ नाही.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

दरम्यान करीनाने आपल्या स्वतःच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या घराची झलकही दाखवली आहे. तिने तिच्या एका नवीन जाहिरातीसाठी पोझ दिली आहे, ज्यामध्ये तिच्या घराचे वेगवेगळे कोपरे दाखवले आहेत. या विविध फोटोंमध्ये करीना तिच्या घराच्या वेगवेगळ्या भागात दिसत आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. पहिल्या फोटोत करीनाने गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. या फोटोत बॅकग्राऊंड खूप शानदार आहे. झाडांनी झाकलेली चादर करीनाच्या बॅकग्राऊंडला आहे आणि फोटोच्या मागे असलेल्या हिरवाईमध्ये करीनाचा फोटो आणखी सुंदर दिसत आहे. करीना नेहमीच आपल्या कुटुंबाबरोबर तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर करीना कपूर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आमिर खानसोबत येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती रणवीर सिंग, विक्की कौशल, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत ‘तख्त’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला तिचा आणि सैफचा अनसीन फोटो, म्हणाली…

-हातात बादली अन् मग घेऊन करीना चाललीय तरी कुठं? फोटो होतोय जोरदार व्हायरल

-‘…करीना तैमुरला युद्ध शिकवेल’, का रंगलीय सपना चौधरीच्या मुलाच्या नावाची चर्चा? ‘सैफिना’ होतायत ट्रोल

Latest Post